आरोग्य

कॉटन बड- इअर ड्रॉपने कान स्वच्छ करताय, या चुका टाळा, व्हाल बहिरे

शरीरातील असे अनेक भाग आहेत जे नाजूक आहेत त्यातील एक कान. कानाला हलकी जरी दुखापत झाली तरी आपल्याला सुचेनासे होते. हल्ली जीवनशैलीनुसार प्रत्येकजण इअरफोन किंवा हेडफोन वापरतात. ज्यामुळे अनेकदा कानातून घाण बाहेर पडत नाही.

आंघोळ करताना किंवा केस धुताना कानाच्या पाणी किंवा साबणाचा फेस जमा होतो. पाणी गेल्यामुळे आपल्याला नीटसे ऐकू येत नाही कानात इतका मळ साचतो की, यामुळे बरेचदा आपला कान दुखू लागतो. अशावेळी आपण बड किंवा ड्रॉपचा वापरुन कान साफ करतात. परंतु, यापद्धतीने कान साफ करणे धोक्याचे ठरु शकते. कान स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक क्रियेची निवड करायला हवी.

1) कान स्वच्छ कसा कराल

कान स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करताना हलक्या हाताने मऊ कापडाने स्वच्छ करा. तसेच कानात टोकेरी किंवा कॉटन बड घालू नका. यामुळे कानाला हानी पोहोचू शकते.

2) कानातील केस, चिकट द्रवमुळे होते रक्षण 

कानाच्या आतील भागात असणारे केस आणि आतील भागात असणारे चिकट द्रव हे कानाच्या संरक्षणाची भूमिका बजावतात. त्यामुळे कानात धुळीचे कण जमा होत नाही.

4) बड नकोच 

कानात बडचा वापर करु नका. परंतु, तरीदेखील अनेकजण त्याचा वापर करतात. यामुळे अनेकदा बड कानात किती खोलवर गेले आहे याचा अंदाज येत नाही. यामुळे कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे कानाला संसर्ग देखील होऊ शकतो. त्यासाठी बड न वापरण्याचा सल्ला दिला जातो.

5) लहान मुलांची घ्या काळजी 

लहान मुलांना अनेकदा सर्दी होते. ज्यामुळे नाकातील सर्दी कानात जाऊन कानातून पाणी वाहू लागते. अशावेळी कोणतेही तेल कानात टाकू नका. त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ओपीडीत ७० टक्के रुग्ण कानाच्या आजाराचे असतात. त्यामध्ये कानात बड घालून संसर्ग झालेले काही रुग्ण असतात. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी तर कानात बड घालू नये. त्यामुळे त्यांना कानात जखम होऊन मोठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

2 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

10 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

10 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

10 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

10 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

11 तास ago