अद्रक रस 1/2 लहान चमचा व 1/2 लहान चमचा मध व 1/2 लहान चमचा आल्याचा हळद एकत्र करून चाटावे. दिवसातून 2 वेळ.
एक लहान चमचा हळद व एक लहान चमचा गाईचे साजूक तुप एकत्र करून मंद उष्णते वर थोडे परतवून घ्यावे व त्यात 1/8 लहान चमचा अद्रक रस व 1/2 लहान चमचा तुलसी रस टाकून एकजीव करून सेवन करावे-असे दिवसातून सकाळ-दुपार व रात्री झोपताना सेवन करावे.
1/2 लहान चमचा हळद, 1/8 लहान चमचा मिरेपूड (चिमूटभर), एक लहान चमचा मध, एक लहान चमचा कोरफड गर एकत्र करून दिवसातून 2 वेळ घेतल्यास कफाचे बेडके येणे बंद होतात.
अर्धा लहान चमचा ओवा, थोडा गूळ व लहान पाव चमचा हळद यांचे मिश्रण जेवणानंतर दुपारी व रात्री घेणे.
3 लवंगची पूड 5 तुळशी पाने, 2 हिरवी विलायचीचे ठेचलेले दाणे, दालचिनी पूड 5 चिमूटभर व थोडा गवती चहा 3 कप पाण्यात मध्यम उष्णतेवर उकळा व पाणी निम्मे झाल्यावर त्यात एक मोठा चमचा खडीसाखर टाकून तयार काढा दिवसातून एक वेळ प्या. (मुळव्याध असल्यास पिऊ नका तसेच उष्ण लघवी होत असल्यास पिऊ नका)
रात्री झोपतांना कोमट पाण्यासोबत 1 मोठा चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे.
खोकला व कफ असल्यास गाईच्या एक मोठा चमचा साजूक तुपात व 10 काळे मिरे टाकून मंद उष्णतेवर गरम करण्यास ठेवावे व मोहरी सारखे मिरे तडतडल्यावर तूप थंड होऊ द्यावे व 2 लहान चमचे खडीसाखर पूड टाकून दिवसातून दोन वेळा जेवणाच्या अगोदर 3 तास घ्यावे.
अद्रक रस दीड लहान चमचा व अडीच लहान चमचा गुळ एकत्र करून त्याच्या 3 गोळ्या तयार करा व सकाळ – दुपार व सायंकाळ घ्या.
छातीत कफ व खोकला येत असल्यास मुठभर फुटाणे व 3 लसूण पाकळ्या सोबत खा व एक तासभर पाणी पिऊ नका व काही खाऊ नका.
5 चिमूट काळी मिरी पूड व 5 चिमूटभर सुंठ पूड यांचे मिश्रण मधातून दिवसातून 3 वेळ घ्या.
सर्दी-कफ-खोकला असल्यास कोमट पाणी प्या. थंड पाणी बिलकुल पिऊ नका
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…