हेल्दी राहण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाकडे लक्ष द्यायला हवं. पॅक फूड मधून प्लास्टिक शरीरात जाण्याचा धोका वाढलेला आहे. यामुळे कॅन्सर, डायबिटीससारखे आजार होऊ शकतात. सद्गुरू सांगतात की कॅन किंवा बॉटलमध्ये ठेवलेले कोणतेही पदार्थ खाणं टाळायला हवं. हे पदार्थ खाल्ल्यानं आजारांचा धोका उद्भवू शकतो.
कॅन किवा बॉटलमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळायला हवं. सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात की तुम्ही कॅन किंवा बॉटलमधलं अन्न खाऊ शकता पण रोज रोज हे असं अन्न खाऊ नका यामुळे गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. कारण या वेगळे घटक शरीरात जातात.
प्लास्टीकचा जास्त वापर कॅन्सरचं कारण ठरू शकतो. खासकरून प्लास्टीकच्या पॉलिथिनमध्ये ठेवलेले गरम पादार्थ खाल्ल्यानं किंवा प्यायल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो. अनेक रिसर्चमधून हे दिसून आले आहे की बिस्फिनॉल ए (बीपीए) नावाचे केमिकल पेशींची संरचना बदलून कॅन्सरचा धोका वाढवतात.
प्लास्टीकपासून बनलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये धोकादायक रसायनं असतात. अभ्यासानुसार ७६ संदिग्ध पदार्थ स्तन कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे घटक दिसून आले. ज्यातील ६१ तत्व प्लास्टीकशी संबंधित होते. ज्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
९० टक्के लोकांना बीपीएचा धोका: पॅकेज्ड फूडमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. जे हाय ब्लड प्रेशरचं मुख्य कारण मानलं जातं. ज्यामुळे हृदयाचे आजार उद्भवतात. कॅन किंवा बॉटल्समधल्या अन्नात फॅट्स जास्त प्रमाणात असते. जे सॅच्युरेडट फॅट असते जे खूपच घाणेरडे मानले जाते. यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल वाढते. जे नसांमध्ये जमा झाल्यामुळे हृदयाचे विकार वाढतात.
डायबिटीस: पॅकेज्ड फूड्स आणि ड्रिंक्समध्ये आर्टिफिशियल स्वीटनरर्स असतात. ज्यात साखर, मीठ वेगानं विरघळतं आणि ब्लड शुगर वाढते. दीर्घकाळ या पदार्थांचे सेवन केल्यानं डायबिटीसचा धोका वाढू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…