आरोग्य

अंग आखडून गेल? ६ व्यायाम करा, शरीर होईल लवचिक आणि वजनही झरझर उतरेल

हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा अंग आखडून गेल्यासारखं होतं. काही जणांना तर पाठ, कंबर, मान दुखण्याचा त्रास नेहमीच होतो. असा त्रास होऊ नये आणि आखडून गेलेलं अंग मोकळं होऊन लवचिक व्हाव.

पहिला व्यायाम आहे अधोमुख श्वानासन. हा व्यायाम केल्याने मांडी, पाठ, हाताचे स्नायू व्यवस्थित ताणले जाऊन त्यांना बळकटी येते.

वीरासन करणेही खूप फायद्याचे ठरते. वीरासन केल्यामुळे हात, पाय यांना बळकटी येते. फुफ्फुसांना ताकद येऊन स्टॅमिना वाढविण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.

शरीराची लवचिकता वाढविणारे वृक्षासन एकाग्रता वाढविण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठीही खूप फायदेशीर ठरते.

आखडून गेलेली पाठ, कंबर, मान मोकळी करण्यासाठी आणि पाठीचा कणा लवचिक होण्यासाठी भुजंगासन केल्याने खूप फायदा होतो.

बालासन केल्याने शारिरीक आणि मानसिक थकवा खूप लवकर कमी होतो. शिवाय हिप्स, मांड्या आणि कंबरेच्या स्नायूंचा खूप छान व्यायाम होतो.

शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी सेतूबंधासन करणेही खूप फायद्याचे ठरते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

2 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

6 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

13 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

17 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

6 तास ago