आरोग्य

आयुर्वेदिक पद्धतीने करा स्किन डिटॉक्स! त्वचेच्या समस्या होतील दूर – फरक दिसेल काही दिवसांत…

बाहेरील वातावरण, धूळ, प्रदूषण यांचा थोडाफार परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. या सगळ्यामुळे आपली त्वचा खराब तर होतेच, शिवाय त्वचेचा पोत बिघडतो आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जसे आपण आपले शरीर आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेतो, तसेच त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. शरीराचीच काळजी घेण्यासाठी जसे बॉडी डिटॉक्स केले जाते, तसेच त्वचेचे आरोग्य आणि सौंदय टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदानुसार त्वचा वेळच्यावेळी डिटॉक्स करणे गरजेचे असते.

त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचे अनेक मार्ग आहेत. जे केवळ त्वचेचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर शरीराला देखील आतून शुद्ध करतात आणि त्वचेची योग्य ती काळजी घेतात.

आयुर्वेदानुसार स्किन डिटॉक्स करण्याची सोपी पद्धत पाहूयात…

१) त्वचेला घाम येणे: शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी त्वचेला घाम येणे खूप गरजेचे असते. सौना किंवा स्टीम बाथमधून घाम गाळल्याने त्वचेच्या आत साचलेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात.

जेव्हा आपल्या त्वचेला घाम येतो तेव्हा आपल्या त्वचेवरील छिद्रे उघडतात आणि ही क्रिया त्वचा स्वच्छ करण्यास अधिक मदत करते. घामामुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते. आयुर्वेदानुसार, शरीरातील दोष संतुलित करण्यासाठी घाम येणे खूप फायदेशीर आहे. स्टीम बाथचा नियमित वापर शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेला गती देतो. ज्यामुळे त्वचा केवळ निरोगी आणि चमकदार राहतेच, शिवाय आरोग्य देखील सुधारते. जर तुम्ही स्टीम बाथ घेत असाल तर आठवड्यातून २ ते ३ वेळा स्टीम बाथ घेणे फायदेशीर ठरेल. जेणेकरून तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतील.

2) ड्राय ब्रशिंग: आयुर्वेदात, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेवर ड्राय ब्रशिंग करण्याची पद्धत वापरली जाते. हा एक प्राचीन उपाय आहे जो डेड स्किन काढून टाकण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी केला जातो. ड्राय ब्रशिंगमुळे त्वचेच्या पृष्ठभागावर साचलेली डेड स्किन आणि घाण निघून जाते, ज्यामुळे त्वचा फक्त स्वच्छच होत नाही तर ती उजळ देखील होते. खबरदारी म्हणून, ही प्रक्रिया त्वचेवर हळूवारपणे करावी आणि कापसाचा किंवा सौम्य नैसर्गिक ब्रशचा वापरावा. स्क्रबिंग करताना त्वचेचे घर्षण टाळण्यासाठी, ते हलक्या हातांनी करावे.

३) त्वचेला मालिश करणे: आयुर्वेदात, अभ्यंग म्हणजेच त्वचेला तेलाने मालिश करणे गरजेचे असते. त्वचेला मालिश केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. हा एक असा उपाय आहे जो केवळ त्वचेचे पोषण करत नाही तर शरीरातील विविध दोषांचे संतुलन देखील करतो. मालिश केल्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचेची चमक वाढवण्यासोबतच त्वचा मऊ आणि चमकदार होते.

मालिशसाठी नेमके कोणते तेल वापरावे

१) वात दोषासाठी तिळाचे तेल: तिळाचे तेल उष्ण असते, जे वात दोष संतुलित करण्यास मदत करते. हे शरीराला उबदार ठेवते आणि त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवते.

२) पित्त दोषासाठी नारळाचे तेल: नारळाचे तेल थंड असते. जे पित्ताला शांत करते आणि त्वचेला आराम देते. हे त्वचेची जळजळ आणि सूज कमी करण्यास देखील मदत करते.

३) कफ दोषासाठी मोहरीचे तेल: मोहरीचे तेल उष्ण असते, जे कफ दोष कमी करते आणि शरीरात रक्ताभिसरण वाढवते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

6 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

7 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

9 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

11 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

11 तास ago