आरोग्य

सतत पित्ताने होणारा त्रास चटकन कमी, पोटही होईल साफ करा हे घरगुती उपाय

जेवण केल्यानंतर पोट फुगणं, आंबट ढेकर येणं असे त्रास अनेकांना उद्भतात. भूक लागण्याआधीच सतत खात राहिल्यानं आंबट ढेकर येतात अनेकदा आंबट ढेकरांमुळे तोंडाची चव बिघडते आणि आंबट ढेकर येऊ लागतात तर कधी छातीत प्रचंड जळजळ होते. अनेकांना स्मोकिंग, दारू पिणं या कारणांमुळेही अपचनाचा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

बडिशेप खा: पोटासाठी बडीशोप खाणं अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतं. बडीशेप खाल्ल्यानं गॅस, ॲसिडीटी, आंबट ढेकरांच्या त्रासापासून आराम मिळतो. बडीशेपेत पचन एंजाईम्सचे उत्पादन वाढवते. हे खाल्ल्यानं खाल्लेलं अन्न लवकर पचण्यास मदत होते. बडीशेप खाल्ल्यानं गॅस, ॲसिडीटी, ब्लॉटींग, आंबट ढेकरांच्या त्रासापासून आराम मिळतो. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खायलाच हवी.

पुदीन्याचा चहा: जर जेवल्यानंतर तुम्हाला गॅस, ॲसिडीटी समस्या जाणवत असेल किंवा आंबट ढेकर येत असतील तर तुम्ही पुदीन्याचा चहा पिऊ शकता. पुदीन्याच्या पानांमध्ये कुलिंग इफेक्ट असतो. ज्यामुळे छातीतली जळजळ कमी होते. आंबट ढेकर येत नाही आणि गॅसेसपासून आराम मिळतो. पुदिना वॉटर किंवा पुदिन्याचा चहा बनवून पिऊ शकता.

जिऱ्याचं पाणी: जिऱ्याचं पाणी पचनक्रियेसाठी उत्तम मानले जाते. जेवल्यानंतर तुम्हाला आंबट ढेकर येत असतील तर तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गॅस, ॲसिडीटीची समस्या उद्भवत नाही. पोटातील ॲसिडीटी रिफ्लेक्स कमी होतात. तुम्ही १ ग्लास पाण्यात १ चमचा पावडर मिसळून पिऊ शकता. जिऱ्याचे पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यासही मदत होते.

आलं चावून खा: आलं पोटासाठी उत्तम मानलं जातं. आंबट ढेकर आल्यास तुम्ही आल्याचे सेवन करू शकता. आल्यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एँटीइँफ्लेमेटरी गुण असतात. जे पचनक्रिया चांगली ठेवतात. आल्याचा रस प्यायल्यानं गॅस, ॲसिडीटीच्या त्रासापासून आराम मिळतो.

हिंगाचे पाणी: आंबट ढेकरांपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाचे पाणी पिऊ शकता. हिंगाचे पाणी प्यायल्यानं पोटदुखीच्या वेदना, गॅस, ॲसिडीटी आंबट ढेकरांच्या त्रासापासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही १ ग्लास कोमट पाण्यात १ चिमुट हिंग मिसळून पिऊ शकता. ज्यामुळे काही वेळातच पोटाच्या त्रासावर आराम मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago