आरोग्य

च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं जातं की, पाणी प्यायल्याने त्वचेवर पुरळ येत नाही. तर कधी सांगितलं जातं की, च्युइंगम खाल्ल्याने चेहरा बारीक होतो. यातील जास्तीत जास्त गोष्टी या गैरसमज असतात.

त्वचेसंबंधी काही गैरसमज 

एक्नेसाठी पाणी 

पाणी प्यायल्याने त्वचेवरील एक्ने दूर होत नाहीत. पाणी प्यायल्याने त्वचेचं एकंदर आरोग्य चांगलं राहतं, पण याचा काही वैज्ञानिक पुरावा नाही की, पाणी प्यायल्याने एक्नेची समस्या दूर होते. एक्ने हार्मोनमध्ये बदल, बॅक्टेरिया, एक्सेस ऑईलचं प्रोडक्शन आणि क्लोग्ड पोर्समुळे होतात. हाइयड्रेटेड राहणं एकंदर पूर्ण त्वचेसाठी फायदेशीर असतं. याने त्वचेमध्ये ओलावा राहतो. पण एक्ने दूर करण्यासाठी हा काही ठोस उपाय नाही.

स्ट्रॉबेरी स्कीनची समस्या

हात-पाय किंवा शरीराच्या एखाद्या भागात अनावश्यक केस वाढतात तेव्हा स्ट्रॉबेरी स्कीन ची समस्या होते. स्ट्रॉबेरी स्कीनची समस्या तेव्हा होते जेव्हा त्वचेवर बारीक बारीक पुरळ दिसू लागते. आणि त्वचा रखरखीत होते. इनग्रोन हेअर म्हणजे अनावश्यक केस येण्याच्या समस्येचं मुख्य कारण हात-पायांवर शेव्हिंग करणं आहे. अशात स्ट्रॉबेरी स्कीनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी असं सांगितलं जातं की, स्क्रब केल्याने त्वचा पूर्णपणे साफ होते. पण डॉक्टर सरीन सांगतात की, स्क्रब केल्यावर ही समस्या दूर होत नाही.

चेहरा बारीक करण्यासाठी च्युइंगम

बरेच लोक असा विचार करतात की, च्युइंगम खाल्ल्याने सुजलेला चेहरा बारीक होतो. मात्र, डर्मेटोलॉजिस्टनुसार फेशिअल मसल्सच्या एक्सरसाईजने चेहऱ्यावर दिसणारं फॅट कमी होत नाही. च्युइंगम चघळल्याने चेहरा बारीक होत नाही, उलट आणि जास्त रूंद दिसू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

12 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago