आरोग्य

जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

पौष्टिक आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे; पण त्याचबरोबर चांगल्या आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. अनेक जण जेवण केल्यानंतर स्नॅक्स खातात. खरेच जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाणे कितपत चांगले आहे.

अनेक लोक वेगवेगळ्या कारणांमुळे स्नॅक्स खातात. कधी ऊर्जा वाढविण्यासाठी खातात; तर कधी त्यांना हार्मोनल बदलांमुळे स्नॅक्स खाण्याची इच्छा निर्माण होते. काही जण रक्तातील साखरेची पातळी कमी झाली म्हणून स्नॅक्स खातात. आश्चर्याची बाब म्हणजे काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि आहार सुधारण्यासाठीही स्नॅक्स खातात.

स्नॅक्स खाणे चांगले की वाईट

एखाद्या वेळेस स्नॅक्स खाणे वाईट नाही; पण तुम्ही सातत्याने स्नॅक्स खात असाल, तर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याबाबत सुषमा यांनी सावध केले आहे. कॅलरीयुक्त स्नॅक्स तुम्ही नियमित खात असाल, तर तुमचे वजन वाढू शकते. त्याशिवाय आहारात पौष्टिकतेची कमतरता भासू शकते. तसेच मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. जर तुम्ही जेवल्यानंतर हेल्दी स्नॅक्सचे सेवन केले, तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. जेवताना तुम्ही पौष्टिक स्नॅक्स खाल्ले, तर आवश्यक ऊर्जा वाढू शकते. अतिप्रमाणात खाणे टाळू शकता. तसेच फळे, सुका मेवा आणि कडधान्ये खाल्ली, तर हा एक चांगल्या पौष्टिक आहाराचा पर्याय ठरू शकतो.

तुम्हाला सतत स्नॅक्स खायची इच्छा होत असेल, तर खाल्लील गोष्टी समजून घ्या

तुम्ही स्नॅक्स का खात आहात, याचे कारण जाणून घ्या

कंटाळा आला असेल म्हणून खाता का? तणाव जाणवतो म्हणून खाता का किंवा भावनेच्या ओघात खाता का? मूळ कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त प्रोटीन्स, चांगले फॅट्स, फायबर व कर्बोदकेयुक्त संतुलित आहार घ्या; ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहील.

दिवसभर भरपूर पाणी प्या

त्यामुळे फार भूक लागत नाही आणि सतत खाण्याची इच्छासुद्धा होत नाही. जर तुम्हाला जेवणानंतर स्नॅ्क्स घ्यायचे असेल, तर आहारात फळे, भाज्या, सुका मेवा, कडधान्ये अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

नियमित व्यायाम करा

ध्यान करा. कारण त्यामुळे तणाव दूर होतो. त्याचबरोबर पुरेशी झोप घ्या. निरोगी जीवनशैलीमुळे सतत खाण्याची इच्छा कमी होते. खरे तर स्नॅक्स खाणे वाईट नाही; पण स्नॅक्स खाताना त्यामागील कारणे समजून घ्या आणि आरोग्यास फायदेशीर असा स्नॅक्स निवडा. निरोगी जीवनशैली अंगीकारा. संतुलित आणि चांगल्या आहाराशी संबंधित मार्गदर्शनासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

24 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

4 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

5 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

5 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

5 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

5 दिवस ago