मुख्य बातम्या

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक

न्हावरे (तेजस फडके) करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर करड्या जवळील देशमुख वस्ती येथे शनिवार (दि २०) दुपारी ५ च्या सुमारास अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारा डंपर अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या घराला धडकला. या घटनेत घराच्या शेजारील शौचालय कोसळले. तर एक झाड आणि कांदा साठवन करणाऱ्या आरनीचेही नुकसान झाले आहे.

या अपघातात डंपर चालक जखमी झाला. घटनेनंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. सुदैवाने घरातील कोणही जखमी झाले नाही. मात्र, अपघातामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असुन सार्वजनिक बांधकाम खात्याने या अष्टविनायक महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

अष्टविनायक महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा…?

करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर १० सप्टेंबर २०२५ रोजी करडे येथुन रांजणगावकडे दोन हायवा ट्रक शेजारी शेजारी जात असताना त्यातील एक हायवा रस्त्यालगत असणाऱ्या विजेच्या खांबाला जोरात धडकला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापुर्वीही या रस्त्यावर अनेकवेळा गंभीर अपघात झालेले आहेत. त्यानंतर १० दिवसांनी २० सप्टेंबर २०२५ रोजी रांजणगाव कडुन करडेच्या दिशेने जाणारा एक डंपर घराला धडक देत थेट शेतात जाऊन थांबला. या दोन्हीही घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. त्यामुळे या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका

गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर

शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

1 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

1 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

1 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

1 तास ago

नाना पाटेकर-सतीश पुळेकरांच्या मैत्रीत दुरावा; ‘इतकी चांगली मैत्री संपली’, पुळेकरांची खंत

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…

2 तास ago

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…

2 तास ago