आरोग्य

तुम्हालाही सतत चमचमीत तिखट खायला आवडते? मात्र अती तिखट तुमच्या ‘असं’ जीवावर बेतू शकत

काही जणांना थोडेही तिखट सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागते. नाक, कान लगेच लाल होतात. साधी मिरचीही काहींना चरचरते तर काही जण बिनधास्त कच्च्या मिरच्या चाऊन खातात. कितीही तिखट खाण्याची सवय काहींना असते. त्यांना तिखट सोसते.

हा-हू असे काहीही आवाज न करता ते मस्त लाल भडक पदार्थ ही खातात. आपण भरपूर तिखट खातो या गोष्टीचा अनेकांना अभिमान वाटतो. मात्र असे अति तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अनेक प्रकारचे शारीरिक त्रास तिखट खाल्याने होऊ शकतात. हेल्थशॉट्स तसेच क्लेवरलँण्ड क्लिनिक हेल्थसारख्या साईट्सवर उपलब्ध असलेल्या मजकूरानुसार, अति मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्याने पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. विविध आजार उद्धवू शकतात.

१) अति तिखट खाल्याने पोटातील आम्ल वाढते. त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. एकदा का आम्लाचा त्रास सुरू झाला की मग सारख्या उलट्या होतात. पोटात दुखायला लागते. तसेच छातीत जळजळ सुरू होते. सारखे हे त्रास सहन करावे लागतात. पचन व्यवस्थित होत नाही. पचन न झाल्याने मळमळायला लागते. मग उलट्या डोकेदुखी असे त्रासही होतात.

2) तिखट खाल्याने जि‍भेच्या सहनशीलतेवर परिणाम होतो. जि‍भेवर फोड येतात. सतत तोंड येते. मग तिखट काय सगळेच पदार्थ खाताना फोड झोंबतात. अति तिखट खाल्याने जिभेची कार्यक्षमताही कमी होते.

३) तिखट खाताना डोळ्यातून पाणी येते. तसेच भरपूर घाम फुटतो. शरीराची ती प्रतिक्रिया असते. शरीर तिखट पचवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे घाम येतो. त्वचा लाल होते. तिखट खाल्याने चेहर्‍यावर पुरळ उठते. कारण तिखट पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात.

४) अति तिखट खाल्याने हृदयावरही परिणाम होऊ शकतो. तसेच गॅस्ट्रीक अल्सर होऊ शकतो. असे आजार फार महागात पडतात.

५) पाईल्स बद्दल तर सर्वांना माहिती आहे. अति तिखट खाल्याने पाईल्सचा त्रास होऊ शकतो. पाईल्स एकदा झाले की मग बसण्या-झोपण्याचेही वांदे होतात. तसेच हा आजार लगेच बरा होत नाही. फार त्रासदायक ठरतो.

६) आतड्यांना तिखटामुळे त्रास होतो. आतड्यांसाठी अति तिखट खाणे धोकादायक ठरु शकते. विविध विकार उद्धवतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा. प्रत्येक चव योग्य प्रमाणातच खावी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

8 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

8 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

8 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

23 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago