शिरुर; चार वर्षात ‘सरपंच’ फक्त ‘नामधारी’ ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या ‘महाशयां’ चीचं लुडबुड…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या कारेगाव येथील माजी महिला सरपंचाच्या पतीने कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील एका कंपनीत काम मिळविण्यासाठी स्वतःची पत्नी सरपंच असताना ग्रामपंचायतच्या लेटरपॅडचा वापर करत स्वतःच्या पत्नीच्या सहीने कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याचे पत्र संबंधित कंपनीला दिले. त्यानंतर कंपनीत काम मिळाल्यानंतर संबंधित कंपनीमुळे कसलेही प्रदूषण होत नसल्याबाबतचे दुसरे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले.

 

याबाबत कोणत्याच ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात घेतले गेले नाही. चार वर्षे या महाशयांची पत्नी सरपंच असताना ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये या महाशयांनी ढवळाढवळ केली. तसेच स्वतःच्या नातेवाईकांना किंवा मर्जीतल्या लोकांनाचं ग्रामपंचायतचं काम कसे मिळेल याची ‘विशेष’ काळजी घेतली. चार वर्षात आम्ही ग्रामपंचायत मध्ये फक्त ‘नामधारी’ होतो. अशी माहिती कारेगावच्या काही ग्रामपंचायत सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना दिली.

 

रांजणगावची औद्योगिक वसाहत उभी राहत असताना कारेगावच्या हद्दीतील जमिनी शासनाने संपादित केल्या. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी पुर्णपणे भूमिहीन झालेले आहेत. त्यामुळे कारेगावच्या हद्दीतील कंपन्यामध्ये आपल्याला छोटा व्यवसाय मिळावा. यासाठी कारेगावचे अनेक युवक स्वतःच्या हिमतीवर औद्योगिक वसाहतीत काम मिळवतात. परंतु हे ‘महाशय’ राजकीय ओळखीचा गैरवापर करुन स्वतःच्याचं गावातल्या युवकांच्या कामावर डोळा ठेऊन मेहुण्याला पुढे करुन ते काम जबरदस्तीने बळकावतात.

 

सध्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. या महाशयांच्या पत्नी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राज्याच्या पदाधिकारी असल्यामुळे त्यांची अजित पवारांशी तसेच माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी जवळीक असल्यामुळे हे ‘महाशय’ साम, दाम, दंड. भेद यां सगळ्या गोष्टीचा वापर करुन कारेगाव हद्दीतील जवळपास सगळ्या कंपन्यामध्ये फक्त मीच काम करणार अशी ‘टिमकी’ मिरवत आहेत. तसेच स्थानिक युवकांना मिळालेली कामे ‘दादागिरी’ करुन स्वतः किंवा मेहुण्याला पुढे करुन तोडत आहेत. त्यामुळे भविष्यात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कंपन्यामधील कामांसाठी जीवघेणा संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहे.

(क्रमशः) 

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

11 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago