आरोग्य

शिंकताना आपले हृदय खरंच काही सेकंदांसाठी थांबते?सत्य काय

अनेकदा सर्दीशिवाय देखील धुळीमुळे किंवा कोणत्यातरी वासामुळे शिंक येते. शिंक येण्याआधी आपल्याला तसे संकेत मिळतात. म्हणजे नाकात विचित्र गुदगुल्या जाणवतात. किंवा काहीतरी हालचाल जावते सिग्नलनंतर मेंदूपर्यंत पोहोचतो आणि शिंक येते. पण तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का की. शिंक येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीर थरथरते. तसेच डोक आतून हालल्यासारखं वाटतं. तसेच त्या शिंकेची कळ कुठेतरी हृदयापर्यंत नक्कीच पोहोचते. म्हणून त्यावेळी असंही जाणवतं की, हृदयाने तेवढा सेकंद ब्रेक घेतला की काय

शिंकताना तेवढ्या सेकंदापुरते हृदयाचे ठोके थांबतात

असं खरंच म्हटलं जातं की शिंक येणे ही एक सामान्य घटना असली तरी, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की शिंकताना तेवढ्या सेकंदापुरते हृदयाचे ठोके थांबतात. खरंच असं होतं का.

हे जाणून आश्चर्य वाटेल

शिंकताना हृदय थांबते असे अनेकदा म्हटले जाते. परंतु हे जाणून आश्चर्य वाटेल की यात काहीही तथ्य नाही. हे खरे आहे की शिंकताना हृदय थांबत नाही. पण जेव्हा तुम्हाला शिंकण्यापूर्वी श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा असे वाटते की तुमचा श्वास मंदावला आहे आणि तुमचे हृदय थांबले आहे की काय. त्यामुळे लगेच लोक देवाचे नाव घेतात.

शिंक आल्यावर नक्की काय घडते

शिंकण्यापूर्वी तुम्ही श्वास घेता तेव्हा तुमच्या छातीवर थोडा दाब पडतो आणि शिंकताना जोराने श्वास सोडला जातो. तेव्हा छातीवरील तो दाब थोडा कमी होतो. या दाबामुळे रक्तप्रवाहात बदल होतात. तसेच कधीकधी जोरात शिंकल्याने छातीत हलकी चमकही येते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडतात की काय असं वाटतं. पण तसे होत नाही.

हृदयाचे ठोके थोड्या-बहुत प्रकारे प्रभावित होऊ शकतात पण…

हा हृदयाचे ठोके थोड्या-बहुत प्रकारे प्रभावित होऊ शकतात. पण शिंकताना हृदय धडधडणे थांबते हे पूर्णपणे खरे नाही. शिंकताना हृदयातील क्रिया अखंडपणे सुरूच असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

14 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago