आरोग्य

वजन कमी करण्याचा सोपा उपाय

आजकाल लठ्ठपणा एक गंभीर समस्या झाली आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. चुकीची लाइफस्टाईल, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी, एक्सरसाईज न करणे, आनुंवाशिक कारण यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की, शरीरात वेगवेगळे आजारही घर करतात. लठ्ठपणामुळे डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या जीवघेण्याचा आजारांचाही धोका असतो. लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचं ठरतं.

तुम्ही काय खाता-पिता यानेही तुमचं वजन वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं. वजन वाढण्याचं कारण तुमची खाण्याची चुकीची पद्धत आहे. ते म्हणाले की, वजन वाढण्याचं एक मोठं कारण जास्त चपात्या खाणं आहे. ते म्हणाले की, वेगवेगळ्या डाळी आणि भाज्यांचं अधिक सेवन केलं पाहिजे. अनेकदा महिला थोडी डाळ किंवा भाजीसोबत पाच ते सहा चपात्या खातात. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

एक वाटी डाळीने होईल फायदा: जर तुम्हाला वजन वाढणं रोखायचं असेल किंवा वाढलेलं कमी करायचं असेल तर पाच ते सहा चपात्या खाऊ नका. त्याऐवजी सहा वाट्या डाळीचं पाणी प्यावं. चपात्या केवळ एक किंवा दोनच खाव्यात.

डाळीमध्ये भरपूर प्रोटीन: डाळी वजन कंट्रोल करण्याची एक बेस्ट पर्याय आहेत. पोट भरण्यासाठी चपातीऐवजी डाळीचं सेवन केलं पाहिजे. वेगवेगळ्या डाळीमधून भरपूर प्रोटीन मिळतं. प्रोटीनने वजन कमी करण्यास आणि मांसपेशी वाढवण्यास मदत मिळते.

जास्त भात खाणंही टाळा: भात लठ्ठपणाचं एक मोठं कारण आहे. बरेच लोक जेवण करताना भरपूर भात खातात. जास्त भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. असं करणं चुकीचं आहे. भात थोडाच खावा आणि त्याजागी डाळ आणि भाज्या खाव्यात.

लहान मुलांना द्या मूग डाळ: वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीर फीट ठेवण्यासाठी डाळीचं पाणी प्यावे आणि लहान मुलांना सुद्धा द्यावं. लहान मुलांना मूग डाळ द्या. या डाळीने शरीराची ताकद वाढते. मूग डाळीच्या पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात. ज्यातून शरीराल पोषण मिळतं.

डाळीचं पाणी प्रभावी: डाळीसोबतच डाळीचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. डॉक्टरही डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. याने लठ्ठपणाही वाढत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…

4 तास ago

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

5 तास ago

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…

7 तास ago

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…

7 तास ago

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…

8 तास ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

8 तास ago