आरोग्य

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य

पाणी शरीरासाठी किती गरजेचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याचं मदतीनं शरीरातील वेगवेगळी कामं करण्यास मदत मिळते. पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दबाव पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्या होतात.

पाणी पिण्याची योग्य पद्धत…

पाणी नेहमीच योग्य पद्धतीनं प्यायला हवं. पाणी कधीच घाईघाईनं पिऊ नये. पाणी हळूहळू एक एक घोट प्यावं. जेणेकरून ते शरीरात ते अब्जॉर्ब व्हावं. खूप जास्त थंड किंवा गरम पाणी कधीच पिऊ नये. पाणी जेवण झाल्यावर नेहमी अर्ध्या तासांनंतर प्यावं. जेणेकरून पचनक्रिया चांगली व्हावी. जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया स्लो होते. सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं फायदेशीर असतं. असं केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

पाणी पिण्याचं योग्य प्रमाण…

सामान्यपणे एका हेल्दी व्यक्तीनं दिवसातून ८ ते १० ग्लास म्हणजे साधारण २ ते अडीच लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण हे प्रमाण तुमचं वय, वजन लिंग, फिजिकल अ‍ॅक्टिविटी आणि वातावरणावरही अवलंबून असतं. तुम्ही जास्त एक्सरसाईज करत असाल आणि तुमचा जास्त घाम जात असेल तर पाणी पिण्याचं प्रमाण वाढेल. जर तुम्ही आजारी असाल आणि औषधांचं सेवन करत असाल तर पाण्यात प्रमाणात बदल होऊ शकतो.

काय काळजी घ्याल…

रोज तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात याची काळजी घ्या. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण यानं शरीरात सोडिअमचं संतुलन बिघडतं, ज्यामुळे हायपोनेट्रेमियाचा धोका वाढतो. पाण्याचं प्रमाणं प्रमाणा तुमच्या शरीराच्या गरजांनुसार बदलू शकतं. पण एकूणच काय तर दिवसभर भरपूर पाणी प्यावं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

17 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

17 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

17 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

17 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

17 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

21 तास ago