आरोग्य

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही

पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात नाही तर तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. जेवताना पाणी पिण्यापेक्षा जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा २० मिनिटांनी पाणी प्यायला हवं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कसं पाणी पिता, किती पिता हे फार महत्वाचं असतं.

जेवणाआधी २ तास २ ग्लास पाणी प्यायल्यानं वजन नियंत्रणात राहतं आणि जास्त खाण्यापासून सुटका मिळते. लठ्ठपणा आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ शिवाली गुप्ता यांनी जेवणाआधी पाणी पिणं आणि लठ्ठपणा कंट्रोल करण्याबाबत अधिक माहिती दिली आहे.

जेवणाच्या आधी पाणी पिण्याचे फायदे

जेवणाआधी पाणी प्यायल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात जेवता. यामुळे कॅलरीजचे सेवन नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगानं होते. पाणी पचनक्रिया सक्रिय करते आणि जेवण पचणं सोपं होतं. शरीरातील फॅट आणि शुगर अवशोषण नियंत्रणात राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जेवणाच्या आधी पाणी प्यायल्यानं सोडा, ज्यूस अन्य कॅलरीज युक्त ड्रिंक्सचे सेवन कमी करता येते. यामुळे वजन वाढण्यापासून रोखता येतं.

पाणी प्यायल्यानं शरीरातील मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो. एक्सपर्ट्स सांगतात की जेवणाच्या आधी ५०० मिलीलीटर पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म २४ ते ३० टक्के वाढतो ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते.

जेवणाआधी पाणी पिण्याची योग्य पद्धत

जेवणाच्या २०-३० मिनिटं आधी १ ग्लास पाणी प्यायल्यानं पोट जेवणासाठी तयार राहते. हलकं कोमट पाणी प्यायल्यास अधिक फायदे मिळतात कारण यामुळे पचनक्रिया एक्टिव्ह राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यानं त्रास वाढू शकतो. जेवताना सतत पाणी प्यायल्यानं अन्न व्यवस्थित जात नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago