आरोग्य

रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक लवंग, लिव्हर होईल मजबूत अन् इम्यूनिटीही वाढेल

किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचन मधील असाच एक मसाला म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. अशात सकाळी रिकम्या पोटी लवंग खाण्याचे काय काय फायदे होतात.

लवंगमध्ये व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅगनीज, कार्बोहायड्रेट आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स आढळतात. हे तत्व अनेक आजारांचा धोका कमी करतात.

लिव्हर हेल्दी राहील

लिव्हर शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. याद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. अशात लिव्हर नेहमीच हेल्दी राहणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही नियमितपणे लवंग खाल तर तुमचं लिव्हर हेल्दी राहणार.

इम्यूनिटी वाढते

शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी गरजेचं आहे की, आपली इम्यूनिटी मजबूत रहावी. लवंगमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि सोबतच यात ॲटी ऑक्सिडेंट्सही असतात. जर लवंग रिकाम्या पोटी खाल तर याने पांढऱ्या रक्तपेशी देखील वाढतात. तसेच शरीराची इम्यूनिटी सुद्धा वाढते.

दातांचं दुखणं होईल दूर

जर तुमच्या दातांमध्ये वेदना होत असेल तर लवंगचा वापर करू शकता. लवंगमध्ये एनाल्जेसिक गुण असतात जे दातांचं दुखणं कमी करतात. इतकंच नाही तर डोकेदुखी होत असेल तर तुम्ही याच्या तेलाचा सुगंध घेऊ शकता. याने लगेच आराम मिळेल. जर हिरड्यांमध्ये इन्फेक्शन झालं असेल तर लवंगाच्या पाण्याने गुरळा करा.

तोंडाची दुर्गंधी होईल दूर

वेगवेगळ्या कारणांनी तोंडाची दुर्गंधी येते. अशात लोक तुमच्यापासून दूर पळतात. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र, केवळ लवंगच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

हाडं होतील मजबूत

लवंग हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर हाडं कमजोर असतील तर तुम्ही सकाळी झोपेतून उठून दोन लवंग चावून खाव्यात. यात मॅगनीज भरपूर असतं. ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.

लवंगाचा चहा 

लवंगमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत. लवंग गरम असल्याने हिवाळ्यात याचं सेवन करण्याचं महत्त्व आणखीन वाढतं. त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अशात हिवाळ्यात लवंगाचा चहा सेवन केल्यास फायदा होतो.

कसा कराल चहा

लवंगाचा चहा तयार करण्यासाठी चार ते पाच लवंग उकडून घ्या. यात मध मिश्रित करुन दिवसातून २-३ वेळा सेवन करा. याने अस्थामाच्या रुग्णांना फायदा होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

57 मिनिटे ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

3 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

3 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

7 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

22 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

22 तास ago