आरोग्य

कांदा खा आणि निरोगी रहा

1) उत्तम आहार हाच उत्तम आरोग्याचा कानमंत्र आहे. आरोग्य नेहमी ठणठणीत ठेवायचे असल्यास कांद्याचे सेवन वाढवले पाहिजे.

2) उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. यामुळेच डॉक्टरही या दिवसांमध्ये भरपूर कांदा खाण्याचा सल्ला देतात.

3) उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही. तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते.

4) कांद्याच्या सेवनामुळे यौन दुर्बलता दूर होण्यास मदत होते.

5) कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे. भरपूर प्रमाणात कांदा खाल्ल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी होतो.

6) कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, खनिज, फॉस्फोरस, कॅलरी, लोह असते. तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरताही भरून काढतो.

7) कच्चा कांद्याचे सेवन केल्याने अपचनाची समस्या कमी होते.

8) सर्दी, कफ अथवा घशाच्या खवखवीवर कांदा रामबाण उपाय आहे.

9) कांद्याच्या रसात गुळ अथवा मध एकत्र करून पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.

10) डायबेटिसचा त्रास असेल तर आहारामध्ये कांद्याचे सलाड म्हणून सेवन केल्यास फायदा होतो.

11) कच्च्या कांद्यामध्ये मिथाइल सल्फाइड आणि अमीनो एसिड असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हृदयाचे रक्षण होते.

12) कांद्यामध्ये सल्फर तत्व अधिक असतात. यामुळे पोट, कोलोन, ब्रेस्ट, फुप्फुस आणि प्रोस्टेट कॅंन्सर होण्याचा धोका कमी होतो. तसेच मूत्र संक्रमणाची समस्या नष्ट होते.

13) रोज कांद्याचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

14) कांद्यामध्ये व्हिटॅमिन “ए” अधिक असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

15) कांद्याच्या रसात साखर मिक्स करून रिकाम्या पोटी खाल्ल्यास किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.

16) कांद्याच्या रसामध्ये दही, तुळशीचा रस आणि लिंबाचा रस एकत्रकरून केसांमध्ये लावल्यास केस गळण्याची समस्या कमी होते.

17) रक्त पातळ राहण्यास मदत होते. त्यामुळे Heart Attack येत नाही.

(सोशल मीडियवरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago