आरोग्य

पेनकिलर गोळ्यांचा अवाढव्य वापर

पेनकिलर मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने थांबतात? वेदना होत असतील तर त्या टाळण्यासाठी आपण लगेच पेनकिलर घेतो. अनेकदा डॉक्टरही आपल्याला पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात. पेनकिलर घेतल्याबरोबर वेदना त्वरित नाहीशा होतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, पेनकिलर मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने वेदना तातडीने नाहीशा होतात? मुळात, जेव्हा आपल्याला दुखापत होते, तेव्हा आपल्या शरीरातील सिग्नल थेट मेंदूला जातो, जो आपल्याला संदेश देतो की आपल्याला वेदना होतायत. ज्यामुळे आपल्याला वेदना जाणवते. मुख्य म्हणजे, वेदना होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे दुखापत झाली आहे किंवा आपल्याला काही धोका याचे संकेत देतात.

दुखापतीला कसं कमी करतात पेनकिलर औषध

पॅरासिटामॉल किंवा ब्रुफेन सारखी औषधं या वेदना एका खास पद्धतीने कमी करतात. जेव्हा आपल्याला दुखापत होते तेव्हा आपल्या शरीरात अशी अनेक रसायनं तयार होतात, ज्यामुळे आपल्याला वेदना होतात. अशा परिस्थितीत, शरीर जखमी ठिकाणी अधिक रक्त पोहोचवू लागतं.

केमिकलमुळे वेदना आणि जळजळ होते

रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशी देखील असतात ज्याचा उपयोग जखम बरा करण्यासाठी केला जातो. या पांढऱ्या रक्तपेशी सोबतच अनेक रसायनंही दुखापतीच्या ठिकाणी पोहोचतात. या प्रमुख रसायनांपैकी एकाचं नाव प्रोस्टॅग्लॅंडिंग आहे. या रसायनामुळे वेदना आणि जळजळ होते.

औषधं कशी काम करतात

जेव्हा तुम्ही औषधं घेता तेव्हा ती हळूहळू तुमच्या रक्तात मिसळतात आणि दुखापतीच्या ठिकाणी तसंच मेंदू पर्यंत पोहोचतात. दोन्ही ठिकाणी, ते वेदना कमी करण्यासाठी हे रसायन तयार होण्यापासून रोखतात, जेणेकरून मेंदू आपल्याला वेदना होत असल्याचे संकेत देत नाही.

वरील महिती वरून एक गोष्ट तर लक्षात येते की पेनकिलर जखम किंवा वेदना यावर औषध नाही, तर ते तात्पुरते आपल्याला म्हणजे मेंदूला त्याच्या कामापासून दुर ठेवते व वेदना होणाऱ्या जागी जे रसायन पोहचते त्यात अडथळा निर्माण करते. परंतु अश्याने वेदना होणाऱ्या भागास आणखीनच नुकसान होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

6 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

6 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

21 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago