आरोग्य

हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका वेळीच येण्यापासून रोखणारी कारणे

1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर हे वारंवार होत असेल तर पेरिफेरल आर्टरी डिसीजचे लक्षण असू शकते. हा आजार तेव्हा होतो जेव्हा कोलेस्टेरॉल पायांच्या नसांमध्ये जमा होतो. ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो.

2) जर आपल्याला थोडे देखील चालल्यानंतर धाप लागणे किंवा श्वास घेण्यास अडचण येत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जा. हृदयापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन न पोहोचल्यास आपल्याला उच्च कोलेस्टेरॉलचा सामना करावा लागू शकतो.

3) चालताना छातीत दाब किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर काळजी घ्या. हे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या एनजाइनाचे लक्षण असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

4) हवामानात बदल झाल्यास अनेकांचे हात-पाय थंड पडतात, हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येतात. असं जर वारंवार होत असेल तर हे कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे होऊ शकते. शरीरात रक्ताभिसरणाची कमतरता जाणवल्यास किंवा पुरेसे रक्त न मिळाल्यास हात-पाय गार होतात.

5) आपले पाय किंवा घोटे चालल्यानंतर किंवा अचानक सुजले तर ही रक्ताभिसरणाची समस्या असू शकते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये पाणी साचू लागते. ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

7 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

7 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

13 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

14 तास ago