आरोग्य

बनावट आल्याच्या चहामुळे होऊ शकतो कॅन्सर

आल्याचा चहा प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पण बाजारात मिळणारं भेसळ आलं तुमच्या शरीराचे नुकसान करू शकते. आल्याचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. अन्नाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आलं खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

आल्यातील गुण आणि पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर यात एंटी इंफ्लेमेटरी एंटी ऑक्सिडेंट्स, डायजेस्टिव्ह, एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी व्हायरल गुण असतात. यात अनेक व्हिटामीन्स, मिनरल्स, बायोएक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात. आल्याचे फायदे बरेच आहेत.

आल्याचं सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवत नाही. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, इम्यूनिटी वाढून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होत. तसंच कॅन्सरचा धोका उद्भवत नाही. आल्याचे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील तेव्हा तुम्ही अस्सल आलं खाल. बनावट आलं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

बाजारात बनावट आलं विकलं जात आहे

मागणी आणि पुरवठा वाढवण्यासाठी बाजारात नकली आल्याचं प्रमाण वाढत आहे. हे आलं खऱ्या आल्याप्रमाणे दिसतं पण यात चव नसते ना वास येत. यातून कोणतेही आरोग्यदायी फायदेही मिळत नाहीत. आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नकली आल्याचे सेवन केल्यानं आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे अपचन, अल्सर अशा समस्या उद्भवतात.

बनावट आल्यामुळे किडनी खराब होऊ शकते

बनावट आल्यातील रसायनं सल्फर, ब्लिचिंग एजेंट किंवा कृत्रिम रंग, शरीरात विष पसरवू शकतात. यामुळे लिव्हर, किडनी आणि आतड्यांवर नकारात्मक परिणाम होतो. नकली आल्याचा वापर केल्यास पोटदुखी, गॅस, अपचन यांसारखे विकार उद्भवतात. इतकंच नाही तर रॅशेज,खाज, घश्यात जळजळ यांसारखे त्रास उद्भवतात.

कॅन्सरचा धोका

दीर्घकाळ नकली आल्याचे सेवन केल्यास हानीकारक रसायनं कॅन्सरचं कारण ठरू शकतात. यातील काही रसायनांमध्ये कॅन्सरकारी घटक असतात. ज्यामुळे श्वसनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बनावट आल्यात पोषक तत्व नसतात. ज्यामुळे इम्यून सिस्टिम कमजोर होते. नकली आल्यातील हानीकारक तत्व ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या ठोक्यांवर प्रतिकूल परिणाम करतात.

आल्याची शुद्धता कशी तपासावी

जेव्हा तुम्ही कोणत्याही भाजीच्या दुकानातून आलं घेतात तेव्हा त्याचा वास हा नेहमी तिखट असतो. नकली आल्याला कोणताही वास येत नाही. आल्याची साल काढताना सालं हाताला चिकटली किंवा त्याचा वास येत राहीला तर आलं अस्सल आहे.

पण जर आल्याला वास आला नाही तर आलं नकली आहे. आलं विकत घेताना स्वच्छ आणि चमकदार असेल तर तपासून पाहा. अनेकदा आलं डिटर्जेंट आणि एसिडने धुतलं जातं. यातील रसायनं याला चमकदार बनवतात. एसिडमध्ये भिजवल्यानं आलं विषारी होते आणि तुम्ही आजारी पडू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago