आरोग्य

उपवास केल्यावर आणखी तरूण होईल शरीर

जसजसं वय वाढत जातं, तसतशी लोकांना म्हातारणाची चिंता सतावत असते. बऱ्याच लोकांना हेच वाटत असतं की, त्यांनी नेहमीच तरूण दिसावं. त्यांचं आयुष्य वाढावं. अनेकांना १०० वर्ष आयुष्य जगण्याची ईच्छा असते. अनेक असेही देश आहेत जिथे लोकांचं सरासरी वय १०० पेक्षा जास्त असतं. आयुष्य कसं वाढवावं? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. उपवास म्हणजेच फास्टिंग केल्यानं तरूण बनता येऊ शकतं आणि हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:वरच टेस्ट केली. टेस्टनंतर त्यांचं बायोलॉजिकल वय कमी झालं.

वय वाढतं राहणं हा तर निसर्गाचा नियम आहे. वेळ कुणासाठीही थांबत नसते. तुम्ही तुमचं खरं वय कमी करू शकत नाही, पण बायोलॉजिकल वय कमी केलं जाऊ शकत. हे कंट्रोल करून तुमचं संभावित आयुष्य वाढवलं जाऊ शकत.

काय असतं बायोलॉजिकल वय

एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून बायालोॉजिकल वय माहीत करून घेता येतं. या टेस्टमधून शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं वय समजतं. हृदय, मेंदू, फुप्फुसं, टिश्यू इत्यादी कोणत्या वयानुसार काम करतात हे जाणून घेता येतं. हे कंट्रोल करून आजारांना दूर ठेवलं जाऊ शकतं. तुम्ही बाहेरून कितीही म्हातारे दिसले, तरी हृदय तरूणच रहाल.

उपवास करून कमी करू शकता वय

उपवास करून वाढतं वय कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे उपवास नक्की करावे. एक दिवसाच्या उपवासापासून सुरूवात करू शकता. डॉ. रवि यांनी ३ दिवस उपवास करण्याआधी आणि नंतर बायोलॉजिकल टेस्ट केली. जाणून घेऊ उपवासाच्या आधी आणि नंतर त्यांच्या अवयवांचं वय काय होतं.

अवयवांच आयुष्य वाढल

३ दिवस उपवास करण्याआधी बायोलॉजिकल वय

फुप्फुसांचं वय ३२.१ वर्ष, रक्ताचं वय ३५.७ वर्ष, लिव्हरचं वय ३१.१ वर्ष, हृदयाचं वय ३२.१ वर्ष, किडनीचं वय ३३ वर्ष, मेंदुचं वय ३४.४ वर्ष, त्यांचं मूळ वय २९ वर्ष.

३ दिवस उपवास केल्यानंतरचं बायोलॉजिकल वय

फुप्फुसांचं वय २७.९ वर्ष, रक्ताचं वय ३६.५ वर्ष, लिव्हरचं वय २९.६ वर्ष, हृदयाचं वय २९.५ वर्ष, किडनीचं वय ३०.८ वर्ष, मेंदुचं वय ३३.५ वर्ष, मूळ वय २९ वर्ष.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago