महाराष्ट्र

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे प्रभारी सचिन सावंत यांनी हा “लोकशाही, तरुणाई आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय” असल्याचे म्हटले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवरून जोरदार टीका केली.

सावंत म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी लढा उभारला. युवक काँग्रेस व NSUI च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज संसद ते रस्त्यावर पोहोचवण्यात आला. गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या, मात्र केंद्र सरकारने प्रभावी कारवाई केली नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार व पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत गृहमंत्री अमित शाह यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर टिळक भवन येथे पेढे वाटून व ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

MHT-CET बाबतही गंभीर आरोप

सचिन सावंत यांनी महाराष्ट्रातील MHT-CET 2026 परीक्षेच्या निकालावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. २०२२ पासून परीक्षेतील अनियमितता वाढल्याचा दावा करत त्यांनी गुणांकन, नॉर्मलायझेशन प्रक्रिया आणि रँकिंग अल्गोरिदमचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली.

त्यांच्या मते, दहावी-बारावीत ४० ते ६० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT-CET मध्ये ९० ते ९९ पर्सेंटाइल मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच यंदा जुळ्या भावांना एकसारखे गुण मिळाल्याने निकालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Betterment Fee’ नव्हे, ‘Betterment Tax’

यावर्षी CAP प्रवेश प्रक्रियेत Betterment Fee च्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्यात आल्याचा आरोपही सावंत यांनी केला. पूर्वी एकदाच ₹1,000 शुल्क भरून सर्व बेटरमेंट फेऱ्यांमध्ये सहभागी होता येत होते. मात्र आता Round 1, Round 2 आणि Round 3 साठी अनुक्रमे ₹1,000, ₹2,000 आणि ₹3,000 असे एकूण ₹6,000 शुल्क आकारले जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर लादलेला “Betterment Tax” असून तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

MHT-CET ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असून तिची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करण्याची आणि निष्पक्ष चौकशी जाहीर करण्याची गरज असल्याचेही सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

8 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

8 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

9 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

12 तास ago