मेष: आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. जे लोक करिअरबद्दल खूप महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. दुपारनंतर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात सतर्क राहा आणि वाद होणार नाही असे पाहा. संध्याकाळपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होतील त्यातून उत्तम लाभ मिळेल.
वृषभ: आजचा दिवस आर्थिक लाभ असून प्रगतीचे उत्तम योग आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी किंवा व्यापाऱ्याशी मतभेद होऊ शकतो. आज तुम्ही कौशल्याने शत्रूंवर मात कराल. घरासाठी एखादी सुंदर वस्तू विकत घेणार आहात. शुभ कार्यांमध्ये खर्च होईल. जीवनात आनंद टिकवून ठेवा, समाजात तुमचा मान-सन्मान नक्की वाढेल.
मिथुन: करिअरमध्ये उत्तम यश आणि व्यवसायात प्रगती आहे. व्यवसाय करताना नशिबाची उत्तम साथ मिळेल. मिथुन राशीचे जे जातक राजकारणात आहेत त्यांना काही अडचणी येऊ शकतात. दुपारनंतर तुम्ही कामात खूप व्यस्त राहणार आहात. रात्री एखाद्या मंगलमय समारंभात कुटुंबासह सहभागी होणार आहात. कामात सर्वांची साथ असेल.
कर्क: आज कामात यश मिळेल तसेच ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. आजचा दिवस नशिबाचे द्वार उघडणार आहे. जीवनसाथी आणि व्यावसायिक भागीदार यांचे मोठे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढतीचे योग आहेत. आज मन शांत राहील पण अति मेहनतीमुळे थकवा येऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. व्यवसायात वातावरण अनुकूल असेल.
सिंह: आजचा दिवस भाग्यशाली असेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश आहे. जे प्रोजेक्ट सुरु आहेत त्यात सतर्क राहा. नोकरीत बढतीचे योग आहेत. तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण होतील. आजचा दिवस आराम करण्याचा आहे. नशिबाची साथ असल्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक लाभ आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
कन्या: आजचा दिवस उत्तम संपत्ती प्राप्तीचे योग निर्माण होत आहेत. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. काही मोठी जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते. नोकरी- व्यवसायात वातावरण उत्तम असेल. एखाद्या मंगलमय कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
तूळ: आज करिअरमध्ये लाभ आणि यश आहे. तुमच्या सुखात वाढ होईल आणि प्रगती योग आहेत. तुम्हाला व्यावसायिक प्रयत्नात उत्तम यश आहे. संध्याकाळी एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे, तेव्हा सतर्क राहा आणि कामावर फोकस ठेवा. वेळेचा सदुपयोग करा, योग्य नियोजन आणि व्यवस्थापन यामुळे कामात उत्तम यश आहे.
वृश्चिक: आजचा दिवस महत्त्वाचा आहे तुम्ही स्वतःला वेळ देणार आहात. जर तुम्ही उच्च पदावर अधिकारी असाल, तर मोठी जबाबदारी मिळू शकते. सरकारी कामे मार्गी लागणार. व्यापारी वर्गासाठी सरकारी करार किंवा परवान्याशी संबंधित कामात प्रगती असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा असून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे लाभदायक आहे.
धनु: आजचा दिवस यशाने भरलेला असेल. धनलाभाचे अनपेक्षित स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही भूतकाळात काळात केलेली गुंतवणूक आता चांगला नफा देईल. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा किंवा मुलाखतीची तयारी करत असाल, तर यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन संपर्क होणार आणि त्याचा मोठा फायदा भविष्यात होईल. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते.
मकर: तुम्ही एखाद्या टीमचे नेतृत्व करत असाल, नोकरीमध्ये बॉससोबत एखाद्या मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. यावेळेत शब्दांचा वापर जरा जपूनच करा. व्यवसायात डिल फायनल होवू शकते. आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. धार्मिक किंवा परोपकारी कार्यांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे.
कुंभ: नोकरी असो वा व्यवसाय प्रगतीचे मार्ग खुले होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर योजना बनवायला सुरुवात करा. कामाच्या ठिकाणी मानसन्मान आणि सहकार्य मिळेल. रिलोकशनचे प्लॅनिंग करत असाल तर वेळ उत्तम आहे.
मीन: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. नोकरी आणि व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. सहकारी तुम्हाला मदत करतील. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. व्यवसायानिमित्त बाहेर जाल. आवडीच्या गोष्टींवर सहज खर्च कराल. घरातील सुख-सुविधा वाढतील. तुमचे कुटुंबीय आज आनंदी असतील. प्रेमसंबंधांमध्ये वेळ आणि पैसे खर्च कराल.
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…