आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला श्रावणी तिसरा सोमवार कसा असेल

मेष: आज व्यापाऱ्यांसाठी एखादी मोठी डील निश्चित होऊ शकते, त्यामुळे मन प्रसन्न होईल. समाजात शुभ खर्च झाल्याने कीर्ती आणि पराक्रम वाढेल. तुमच्यासाठी सुखसमृद्धीचे प्रबळ योग बनत आहेत, सायंकाळपर्यंत एखादा मोठा व्यवहार निश्चित होईल. तुमच्यासाठी धनवृद्धी असून तुम्ही उधार दिलेली रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे.

वृषभ:  तुमचे लक्ष नव्या योजनांकडे लागेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल तसेच काम वाढणार आहे. प्रवासाला जाण्याचे योग बनत आहे. कायदेशीर वादात विजय होईल, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, लाभ होईल. कुटुंबात अतिरिक्त जबाबदारी वाढणार आहे.

मिथुन: आजचा दिवस फार रचनात्मक आहे. एखादे रचानात्मक आणि कलात्मक काम पूर्ण करण्यात तुमचा दिवस जाईल. तुमचे आवडीचे काम करण्याची संधी मिळेल. थोड्या अडचणी येतील आणि तुम्ही गोंधळून जाणार आहात पण काळजी करु नका. कामात फोकस आणि मेहनत महत्त्वाची आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न करा…

कर्क: आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही जोश उत्साहात काम करता पण काही वेळा त्यात चुका होतात. अशी कामे तुमच्यासाठी त्रास बनू शकतात. दुसऱ्यांचाही विचार करा आणि त्यानुसार कार्य करा. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि तुमच्या महत्त्वपूर्ण चर्चा पूर्ण होतील. कार्यालयात तुमच्या मतांनुसार वातावरण बनेल आणि तुमचे मन आनंदात राहील. जोडीदाराची मदत मिळेल.

सिंह: नशिब साथ देईल आणि तुम्ही करिअरच्या बाबतीत फार व्यस्त असाल. आज तुम्हाला अभ्यासात थोडा वेळ काढला पाहिजे. कार्यक्षेत्रात वरिष्ठ लोक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. तुमची नजर चौफेर हवी आणि काम करताना सतर्क राहा. कामात नशिबाची साथ आहे पण सावध राहा.

कन्या: लोकांना नशिब साथ देईल आणि तुम्हाला आज प्रत्येक बाबतीत संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला असे वाटले की एखादी व्यक्ती तुमचा गैरफायदा घेत आहे तर त्यापासून दूर राहा. ऑफिसमधील बदल सकारात्मक होतील आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम केले तर प्रत्येक विषयांत यश मिळू शकते.

तुळ: नशिबाची साथ मिळत आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा राहील. तुम्हाला प्रत्येक कार्याता मनासारखे यश प्राप्त होतील आणि तुमच्या कार्य योजना यशस्वी होतील. सर्व विवाद आज संपून जातील. नवीन प्रकल्पावर काम सुरू होऊ शकते. जमीन, संपत्तीच्या विषयांत कुटुंब आणि इतर आजूबाजूचे लोक अडचणी आणतील, सतर्क राहा.

वृश्चिक: लोकांना आर्थिक लाभ होईल आणि दिवसभर लाभाच्या संधी मिळतील, त्यामुळे काम करत राहा. कुटुंबात सुखशांती आणि स्थिरतेचा आनंद घ्या, तरच तुम्हाला लाभ होईल. नोकरी आणि व्यापारात काही नाविन्य आणू शकला तर भविष्यात लाभ होईल. जोश आणि उत्साहात काम करणार आहात. तुमच्यासाठी आज लाभाचे योग आहेत.

धनु: नशिब साथ देईल आणि आज तुमचा गृहोपयोगी वस्तूंवर खर्च होईल. कौटुंबिक सुखाच्या वस्तू घरी येणार आहेत. तुमचे कर्मचारी किंवा एखाद्या नातेवाईकामुळे तणाव वाढेल. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा, पैसे अडकू शकतात. तुम्हाला दिवस कोर्टकचेरीची फेरी मारावी लागेल, पण यात तुम्हाला यश मिळेल..

मकर: लोकांना नशिबाची साथ राहील आणि व्यावसायिक क्षेत्रात मनानुसार लाभ झाल्याने आनंद होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आणि तुम्हाला लाभ होईल. व्यवसाय बदलाची योजना तयार करा. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. वाहनाचा वापर करताना सावध राहा.

कुंभ: आर्थिक लाभ होईल आणि अचानक काही मोठे खर्च करावे लागतील. धावपळ आणि अधिक खर्चाची स्थिती राहील. एखादी संपत्ती खरेदी विक्री केल्याने नफा होईल. सर्व वैधानिक बाबी नीट पडताळून पाहा. सायंकाळी जोडीदाराची तब्येत बिघडू शकते, काळजी घ्या.

मीन: आर्थिक लाभ होईल आणि तुमचे जीवन आनंदी राहील. आज दूरचा किंवा जवळचा प्रवास असून त्यातून लाभ होईल. व्यवसायाच्या प्रगतीमुळे आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक ताणातून सुटका होईल. आज भटकंती वेळी महत्त्वाची माहिती मिळेल. आज तुम्ही रिलॅक्स असाल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

4 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

8 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

8 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

8 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

8 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

8 तास ago