महाराष्ट्र

राज्यात खरीपातील पीक नोंदणी ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ अ‍ॅपद्वारे

पुणे (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील खरीप हंगामातील ई-पीक पाहणी म्हणजेच सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी आता ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत स्वतःच्या शेताची पीक पाहणी करुन नोंदणी करता येणार आहे.

पीक नोंदणीसाठी अ‍ॅपमधून शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकाचा फोटो घेणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात एक सहायक नेमण्यात आला आहे. शेतकऱ्यांची पाहणी पुर्ण झाल्यानंतर १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान सहायक उर्वरित क्षेत्राची पाहणी करतील.

राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु असुन, गेल्या वर्षापासून हे अ‍ॅप संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामासाठी अ‍ॅपचे व्हर्जन ४.०.० गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अ‍ॅप अपडेट करून, सहायकांवर अवलंबून न राहता स्वतःच पाहणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच अडचणी आल्यास गावातील पीक पाहणी सहायकाकडून मदत घेता येणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago