भरपूर झोपणं, म्हणजेच फक्त विश्रांती नाही. छोटासा ब्रेक घेऊन नित्याचा ताण कमी करण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यात येतात
खरंतर आपल्याला सात वेगवेगळ्या प्रकारांची विश्रांती हवी असते.
१) शारीरिक विश्रांती
झोपणे, शारीरिक श्रम किंवा हालचाली न करणे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ या पाचही इंद्रियांना विश्राम देणे.
२)मानसिक विश्रांती
विचारांची, आठवणींची गती कमी करणे, थांबवणे. ध्यान किंवा योगाद्वारे मन शांत करणे.
३) भावनिक विश्रांती
स्वतःच्या मनात गोंधळ घालणाऱ्या भावनांकडे थोडे अलिप्त होऊन बघणे. त्या समजून घेणे, त्यांचा स्वीकार करणे, त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे.
४)सोशल विश्रांती
इतरांपासून काही काळ दूर राहणे. विशेषतः ताणतणावाच्या तसेच सतत खूप अपेक्षा करणाऱ्या संबंधांपासून लांब राहून स्वतःला प्राधान्य देणे.
५) सर्जनशील विश्रांती
आवाजाचा अभाव असलेले बोटांनी करायचे छंद जोपासणे. हस्तकला, चित्रकला, शिवण, मातीकाम, रंगकाम यांसारख्या गोष्टीत सहभागी होणे.
६) आध्यात्मिक विश्रांती
ध्यान, प्रार्थना करणे. ऊर्जा देणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे. आपण म्हणजे केवळ हे शरीर ही चुकीची, संकुचित धारणा संपायला याची मदत होते.
७) प्राकृतिक विश्रांती
पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभुतांसोबत वेळ घालवणे. “निःशब्द होऊन हे महत्त्वाचं” जंगलात फिरणे, समुद्रकिनाऱ्यावर बसणे, आकाश दर्शन करणे. नुसतं झोपूनही थकवा जात नाही असं वाटतं असेल तर नक्कीच यापैकी अन्य कोणत्यातरी विश्रांतीची आवश्यकता आहे हे नक्की. कारण या सर्व प्रकारच्या विश्रांती आपल्या अस्तित्त्वासाठी आवश्यक असतात आणि त्यांचा संतुलित वापर केल्याने आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…