ज्येष्ठमधाचे अनेक उपयोग आहेत. यापैकी सर्वात जास्त उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी करता येतो. याचा नक्की कसा वापर करायचा आणि कोणत्या त्रासावर याचा उपयोग होतो ते आपण बघूया.
तोंडातील अल्सर काढण्यासाठी
शरीरात उष्णता जास्त असेल तर बरेचदा तोंड येणे अर्थात तोंडात अल्सर होण्याचा त्रास बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो. ज्येष्ठमध गाळून घ्या अथवा ज्येष्ठमधाची पावडर, त्यात गाईचे तूप आणि तिळाचं तेल घाला आणि हे मिश्रण तोंडाला लावा अथवा नाकात घाला. यामुळे अल्सर निघून जाण्यास मदत मिळते.
अॅसिडीटी: ही समस्या कोणाला झाली नाही अशी एकही व्यक्ती नसेल. यासाठी तुम्ही ज्येष्ठमध चूर्णासह मध, आवळा पावडर आणि तूप मिक्स करून मिश्रण बनवा आणि हे चाटण तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची अॅसिडीटीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
अतिसार: कधीतरी हा त्रास होतोच. पण त्यावेळी घाबरून न जाता तुम्ही ज्येष्ठमधाचा उपयोग करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही ज्येष्ठमध, जायफळ, डाळिंबाच्या सालीची पावडर, खडीसाखर याचा काढा करून प्या. यामुळे तुम्हाला लगेच फरक जाणवले. जर तुम्हाला काढा करायचा नसेल तर तुम्ही ज्येष्ठमधाच्या चूर्णाचं तुपाबरोबर चाटण करूनही खाऊ शकता.*
तुमच्या प्रायव्हेट पार्टजवळ आलेले रॅश दूर करण्यासाठी: कधीतरी अति घाम अथवा सतत चालण्याने आपल्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टजवळ रॅश येतात. हा भाग अतिशय नाजूक असतो. मग अशावेळी काय करायचं. घरगुती उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठमधाचा यासाठी वापर करू शकता. ज्येष्ठमध पावडर आणि शंखभस्म या दोन्हीचे मिश्रण करून तुम्ही ती पावडर त्या जागी लावा. पण हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कारण तुमची ही जागा अतिशय संवेदनशील असते आणि त्यामुळे कोणताही उपचार त्यावर करण्याआधी तुम्हाला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
उचकी थांबवण्यासाठी: बरेचदा पाणी पिऊनही उचकी थांबत नाही. मग अशावेळी आपण नाक बंद करतो अथवा मध चाटतो. पण तरीही उचकी थांबत नसेल तर तुम्ही नुसता मध न खाता ज्येष्ठमधाच्या चूर्णामध्ये मध घाला आणि हे चाटण खा. तुम्हाला परिणाम लगेच दिसून येईल.
उलटी करताना रक्त येणे: कधीतरी उलटीचा त्रास होत असेल आणि उलटी करताना रक्त आले तर घाबरून जाऊ नका. कधीतरी तुम्हाला जेवणातून त्रासदायक पदार्थ पोटात गेल्याने असे होण्याची शक्यता असते. त्यावेळी तुम्ही ज्येष्ठमध पावडर आणि पांढरे चंदन हे दुधातून उगाळून त्याचे मिश्रण तयार करा आणि हे चाटण तुम्ही खाल्ल्यास तुमचा हा त्रास बंद होईल.
घशाची खवखव थांबवण्यासाठी: कधीकधी घशाची खवखव काही केल्या थांबत नाही अथवा घसा सतत दुखत असेल तर अशावेळी ज्येष्ठमध हा सर्वात रामबाण उपाय आहे. ज्येष्ठमधाची पावडर, तूप, गूळ आणि मध याचे चाटण तयार करून दिवसभरात दोन ते तीन वेळा अगदी थोडे थोडे चाटावे. यामुळे लगेचच दोन दिवसात तुमच्या घशाची खवखव थांबण्यास मदत मिळते.
तापासाठी: ताप हा नेहमी येतो जातो. पण तुम्हाला जर डॉक्टरच्या औषधानेही गुण येत नसेल तर तुम्ही तापावर घरच्या घरी औषध म्हणून ज्येष्ठमधाचा वापर करू शकता. तापावर आयुर्वेदिक औषध हे नेहमीच गुणकारी ठरते. त्यातही ज्येष्ठमधाची पावडर, त्यात मनुका, मोहाचे फूल, वाळा, त्रिफळा हे सर्व मिक्स करून समप्रमाणात कुटून घ्या. रात्रभर गरम पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळे तुम्हाला त्वरीत गुण मिळेल.
अंगावर उठणाऱ्या पित्तासाठी: आपल्यापैकी काही जणांनां अंगावर पित्त उठण्याचा त्रास असतो. पण त्यावर ज्येष्ठमध हा अतिशय गुणकारी उपाय आहे. त्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागत नाही. तुम्ही ज्येष्ठमध उगाळून दुधातून घेतलं तर त्याचा परिणाम लगेच तुम्हाला दिसून येईल. तुमच्या अंगावर उठलेले पित्त घालवण्यासाठी हा रामबाण इलाज आहे.
जखम भरण्यासाठी: बरेचदा शरीरावर झालेल्या जखमा पटकन बऱ्या होत नाहीत. डॉक्टरांनी दिलेले मलमही त्यावर काम करत नाही. मग अशावेळी आपण ज्येष्ठमधाचा उपयोग करून घेऊ शकतो. ज्येष्ठमधाचा काढा तयार करावा आणि ती जखम धुवावी. तसेच ज्येष्ठमध पावडरमध्ये तूप मिक्स करून जखमेवर लावल्यास, जखम बरी होण्यास मदत मिळते.
मानसिक बुद्धीसाठी: शरीरासह मनही आजारी असू शकतं. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बुद्धी कोणता विचार करतेय हे आहे. पण तुम्ही ज्येष्ठमध चूर्ण नियमित दुधाबरोबर सेवन केलं तर तुम्हाला मनःशांती मिळण्यास मदत मिळते. हे अतिशय शांत औषधी असून तुम्हाला शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी आणि आपसुकच त्यामुळे मनावरही थंडावा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते.
मासिक पाळीच्या त्रासात उपयोगी: मासिक पाळीचा त्रास हा प्रत्येक महिलेला होत असतो. त्यासाठी आपण बरेच इलाजही करत असतो. पण त्यामध्ये तुम्ही ज्येष्ठमधाचा वापर करून पाहा. तुम्ही ज्येष्ठमध पावडर, दूध, साखर, उडदाचे पीठ, मध हे सर्व एकत्र करून त्याचे सेवन करा. यामुळे मासिक पाळीचा त्रास सहन करण्यासाठी मदत मिळते. तसंच तुमचा त्रासही कमी होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…