महाराष्ट्र

शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन

काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेणार

जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर): पहेलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावेळी त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या हल्ल्यानंतर आदिलच्या बलिदानाची दखल घेऊन आपल्या कुटुंबियांना मदत केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले.

पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हे दहशतवादी भारतीय नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालत होते. त्याचवेळी घोडेवाला म्हणून काम करणाऱ्या सय्यद आदिल हुसैन शाहने त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्यासोबत आलेल्या काही पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतवाद्यांनी त्याचे तोंड बंद करण्यासाठी त्यालाही गोळ्या घालून ठार केले. त्याने दाखवलेल्या या धाडसाची देशभर चर्चा झाली.

पर्यटकांचा जीव वाचवता वाचवता त्याचा जीव गेल्याने सय्यद कुटुंबातील कमावता हात कायमचा हिरावून घेतला गेला होता. अखेर त्याने दाखवलेल्या धाडसाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी पाठवून त्यांना पाच लाखांची मदत देऊ केली होती. या मदतीची जाण ठेवून त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना शिंदे यांनी, आपण आपला मुलगा या हल्ल्यात गमावला असून त्यापुढे केलेली ही मदत नगण्य असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ही मदत देऊन आपण देशवासीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे सांगितले. तसेच शिवसेना पक्ष हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा असून यापुढेही आपल्याला लागेल ती मदत नक्की करू असे त्यांना सांगितले. या हल्ल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी केंद्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील पर्यटकांनी पुन्हा इथे यावे आणि ही जागा पुन्हा अधिसारखीच नंदनवन व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासन इथे जागा घेऊन सुसज्ज असे महाराष्ट्र भवन उभारणार असून त्याद्वारे जास्तीत जास्त पर्यटकांचे पाय पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरकडे वळतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच येथील हॉटेलवाले, घोडेवाले, टुरिस्ट गाईड, छोटे मोठे दुकानदार यांना पुन्हा एकदा हक्काचा रोजगार मिळेल असे दिवस आणण्यासाठी सारे सोबत राहून पुन्हा प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. आदिलच्या कुटुंबियांना लागेल ती मदत करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असे सांगून त्यांनी त्यांना आश्वस्त केले. यावेळी आदिलचे आई वडील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरगाव चौफुला येथे चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; पती, पत्नी व ११ वर्षीय मुलगा जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे): नागरगाव चौफुला ते शिरुर रस्त्यावर हॉटेल कुलस्वामिनीच्या जवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला…

32 मिनिटे ago

शिरुर तालुक्यात उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक बसुन भाजलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथे विजेच्या खांबावर काम करत असताना उच्चदाब विद्युत वाहिनीचा…

39 मिनिटे ago

शिरुरमध्ये भरदिवसा घरफोडी; सव्वातीन लाखांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील जोशीवाडी परिसरात भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सोन्या-चांदीचे…

57 मिनिटे ago

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

20 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

22 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

22 तास ago