आरोग्य

रोज चहासोबत ब्रेड खाण्याची सवय घातक

भरपूर लोक सकाळी चहासोबत ब्रेड खातात. ब्रेड खाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, ब्रेडमध्ये असे काही तत्व असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. तुम्हीही रोज सकाळी चहासोबत ब्रेड, टोस्ट किंवा बिस्कीट खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. रोज ब्रेड खाल्ल्यानं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हृदयासाठी नुकसानकारक

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण ब्रेडमध्ये सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतं. सॅच्युरेटेड फॅटमुळे हृदयासंबंधी समस्या गंभीर होऊ शकते आणि जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला हृदय निरोगी आणि मजबूत ठेवायचं असेल तर ब्रेड खाणं बंद केलं पाहिजे.

लठ्ठपणा

कार्बोहायड्रेट्स आणि शुगर रिच ब्रेड लठ्ठपणाचा कारण बनतात. एकदा का लठ्ठपणा वाढला तर शरीरात वेगवेगळे आजार घर करू लागतात. कारण लठ्ठपणा हा अनेक आजाारांचं मूळ आहे. रोज ब्रेड खाल्ल्यानं ब्लड शुगरची समस्या होऊ शकते. ब्रेडमुळे रक्तात शुगर वाढते. त्यामुळे ब्रेड कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत. रोज ब्रेड खाण्याची सवय अनेक आजारांचा धोका वाढवते.

गट हेल्थवर प्रभाव

अनेकदा ब्रेड खाणाऱ्या लोकांना पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. ब्रेडमध्ये असलेला मैदा तुमच्या आतड्यांचं आरोग्य खराब करतो. ब्रेड पचन होण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे पचनासंबंधी अनेक समस्या होतात. ब्रेडमुळे ॲसिडिटी, जळजळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता अशा समस्या होणं कॉमन आहे. ब्रेड आणि चहा सकाळी खाल्ल्याने पोटातील आतड्यांना फोड येतात. ब्रेड पचनक्रियेसाठी नुकसानकारक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

26 मिनिटे ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

21 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

21 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

21 तास ago