आरोग्य

आरोग्यवर्धक आवळा

भारतातील प्रत्येक व्यक्‍तीला आवळा हे फळ माहीत आहे, पण आवळ्याचा योग्य उपयोग आरोग्यासाठी कसा करावा हे प्रत्येकालाच माहीत असतेच असे नाही. आपल्याला माहीत आहे की डोक्‍याच्या घनदाट काळेशार केसांपासून तर सुंदर तेजस्वी टवटवीत चमकणाऱ्या त्वचेसाठी विटामिन-सी ची आवश्‍यकता असते.

आवळ्यात विटामिन-सी चे प्रमाण भरभरून असते. तसेच विटामिन ए, बी-कॉम्प्लेक्‍स, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, आयर्न आणि फायबरयुक्त गुण असतात. हे शरीराच्या अनेक समस्यांचे निवारण करतात. अनेक औषधी मात्रांनी संपन्न आवळ्याला आपण कच्चा पण खाऊ शकतो, आवळ्याचे ज्युस बनवून पिऊ शकतो, मुरब्बा आवळा कंठी अनेक प्रकारे आवळ्याचे सेवन करू शकतो. आवळ्याला संस्कृत मध्ये अमृत फल म्हटले जाते. आवळ्याची पानं, फुलं, बिया, साल सर्वांमध्ये औषधीय गुण आहेत. भारताऐवजी मलेशिया, चीन मध्ये सुद्धा आवळ्याचे भौगोलिक वर्णन आढळून येते.

आवळा खाण्याचे फायदे

आवळा इम्युनिटी पॉवर वाढवतो.

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो.

केसांची पोत सुधारण्यास मदत करतो.

पोटासंबंधी आजार दूर करतो.

आवळ्यात विटामिन-सी सोबत अँटी ऑक्‍सिडेंट जास्त प्रमाणात असते जो केसांचे नैसर्गिक रंग टिकवून ठेवतो.

केसांना अवकाळी लवकर सफेद होण्यापासून वाचवतो.

आवळा खाल्ल्याने रक्त शुद्ध होते

लिव्हरचे आजार बरे करण्यासाठी मदत होते.

मोटापा कमी करण्यासाठी उपयुक्त.

आवळा खाल्ल्याने दात मजबूत होतात.

आवळा बुद्धिवर्धक असतो.

बुद्धिजीवी व्यक्ती आवळापासून बनवलेले च्यवनप्राश, आवळा कंठी, आवळ्याचा मुरब्बा सारखे पेय बुद्धी तल्लख करण्यासाठी उपयोगात आणतात.

आवळ्याच्या अतिसेवनाचे नुकसान

गर्भवती स्त्रियांनी आवळा कमी प्रमाणात खावे कारण पाचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

लो ब्लड शुगर मध्ये जे व्यक्ती डायबिटीसची औषधी घेत असतील त्यांनी आवळ्याचे सेवन कमी करावे.

आवळ्याच्या अतिसेवनाने शरीरात सोडियमची लेव्हल वाढते आणि यामुळे किडनीची समस्या उद्भवू शकते. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.

ज्या व्यक्तींना ब्लड डिसऑर्डरचा त्रास आहे त्यांनी आवळा कमी प्रमाणात खावे.

आवळा खाल्ल्यानंतर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी दुधापासून बनवलेले पेय जसे चहा कॉफी वगैरे पिऊ नये. असे केल्यास हानिकारक ठरू शकते.

आवळा ड्राय असतो म्हणून खाल्ल्यावर भरपूर पाणी प्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

8 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

8 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

8 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

10 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

22 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

22 तास ago