आरोग्य

निरोगी नि मजबूत दात

स्वयंपाकघरात असे बरेच मसाले आहेत ज्यांचे काम अन्नाची चव वाढविण्या सोबतच अनेक प्रकारच्या वेदना आणि अस्वस्थता दूर करणे देखील आहे. आपल्या पैकी बहुतेकांना दातदुखीचा त्रास कधीतरी झालाच असेल, अशा परिस्थितीत औषधे घेण्या ऐवजी स्वयंपाकघरातील हे पदार्थ वापरून पहा, जे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहेत.

केळीच्या आणि संत्रीच्या सालींचा अंतर्गत भाग दातांवर रगडा आणि थोड्या वेळाने ब्रश करा. दररोज असे केल्यास दातांचा पिवळसरपणा कमी होऊ लागतो.

एक चमचा मीठ एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून घ्या आणि या पाण्याने चांगल्या प्रकारे गुळण्या करा. दिवसातून असे दोनदा केल्याने दातदुखी आणि हिरड्यांच्या सूज कमी होते. तसेच तोंडाचा वास येणे देखील थांबते.

जर दात अचानक हलू लागला असेल तर खाण्याचा सोडा आणि हळद मिसळून त्याने ब्रश करा. काही दिवसात दातांचे हलणे थांबेल.

रॉक मीठात राईच्या तेलाचे काही थेंब मिसळून पेस्ट बनवा. दररोज सकाळ संध्याकाळ जेवण झाल्या नंतर याने ब्रश करा. दातांचे हलणे थांबेल.

अडीच चमचा लवंग पावडर मध्ये एक चतुर्थांश चमचा रॉक मीठ मिसळा आणि एका डबीत ठेवा. रोज रात्री झोपण्याच्या आधी या भुकटीने ब्रश करा. दातदुखी पासून आराम मिळेल.

तुळशीची पाने चघळण्याने दातदुखी पासून आराम मिळतो.

पिंपळाच्या झाडाच्या सालीची पावडर बनवून एका डबीत ठेवा. त्यास आठवड्यातून एकदा दातांवर घासा. दात मजबूत होतील.

एका भांड्यात मीठ नि हळद सम प्रमाणात घ्या. त्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब घाला आणि हिरड्यांवर मालिश करा. हिरड्या मधील होणारा रक्तस्त्राव थांबेल.

एक चमचा नारळ किंवा तिळाचे तेल तोंडामध्ये चारही बाजूंनी फिरवा. थोड्या वेळाने तेल थुंकून द्या. कोमट पाण्याने गुळणी करा आणि एका तासासाठी काहीही खाऊ नका. यामुळे दातदुखी बंद होईल आणि तोंडाचा वास देखील येणार नाही.

दातदुखी झाल्यास कच्च्या कांद्याचा तुकडा तोंडात ठेवा आणि थोड्या वेळाने थुंकून द्या.

एक ग्लास पाण्यात थोडे मीठ आणि तीन किंवा चार पेरूच्या पानांना उकळवा. दिवसातून दोनदा या पाण्याने गुळण्या करा. दातदुखी पासून आराम मिळेल.

तोंडात फोड झाले असतील तर ग्लिसरीन मध्ये थोडी भाजलेली तुरटी घाला आणि रुईने यास फोडांवर लावा. लाळ टपकू द्या. थोड्या वेळात आराम मिळेल.

ओवा तव्यावर भाजून त्याची पावडर बनवा. दररोज या पावडरने ब्रश केल्यास हिरड्यांची सूज कमी होते.

पायोरियामुळे तोंडाला दुर्गंधी येत असेल तर दररोज सकाळ संध्याकाळ तोंडात एक लवंग ठेवा. वास येणे थांबेल.

जर दाता मधून रक्तस्त्राव होत असेल तर तुरटीच्या पावडरने ब्रश करा. थोड्या वेळातच आराम मिळेल.

हिरड्यांत सूज असेल तेव्हा एक कप उकळत्या पाण्यात एक चमचा वाळलेल्या पुदीनाची पाने घाला आणि २० मिनिटे झाकून ठेवा. थंड झाल्यावर या चहाने गुळण्या करा. जर पुदीना घरात नसेल तर ब्लॅक-टी ने गुळण्या करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

1 दिवस ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago