जेवणात दिसणारी हिरवीगार कोथिंबीर फक्त सजावटीसाठी वापरली नसून, ती म्हणजे आरोग्याचा खजिना आहे. कोथिंबीर खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, रक्त शुध्द होतं आणि मूत्रासंबंधी त्रास कमी होतो. जर रोजच्या आहारात कोथिंबीर असली, तर आरोग्य चांगलं राहणं हमखास ठरलेलं आहे.
कोथिंबीर सलाड मध्ये टाकली की त्याची चव दुप्पट होते. हिरवीगार चटणी बनवून खाताना जेवणातली मजाच वेगळी असते. कोथिंबीर भाजी, दाल, आमटी, सूप किंवा रायत्या मध्ये वापरू शकता. दिवसातून साधारण १५ ते २० पाने तरी खाल्ली, तर शरीराला पुरेसं पोषण मिळतं. कोथिंबीर सकाळी उपाशीपोटी चटणीच्या स्वरूपात खाल्ल्यास रक्त शुध्दीकरणात जास्त मदत होते. कोथिंबीर मूत्रवर्धक आहे, त्यामुळे शरीरातला अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकायला मदत करते. ज्यांना वारंवार सूज येते, लघवीसंबंधी त्रास होतो त्यांच्यासाठी ही औषधासारखी काम करते. यामध्ये असणारे नैसर्गिक घटक पचनक्रिया सुधारतात, अपचन, गॅस आणि पोटफुगी पासून आराम मिळतो. तसेच रक्तातील अशुध्दता कमी करून त्वचाही स्वच्छ व तजेलदार ठेवते.
कोथिंबीरचा वापर जास्त करून जेवणासोबत करावा. सकाळी नाश्त्यासोबत हिरवी चटणी, दुपारच्या जेवणात सलाड, रात्रीच्या आमटीत वरून टाकलेली कोथिंबीर असा नियमित वापर सर्वात चांगला आहे. दिवसातून साधारण एक मूठभर कोथिंबीर खाल्ल्यास पचन आणि मूत्रसंस्था दोन्ही तंदुरुस्त राहतात. मात्र अतिशय जास्त प्रमाणात सेवन केल्यास थोडासा त्रास होऊ शकतो, त्यामुळे संतुलित प्रमाणातच वापरणं योग्य. कोथिंबीर ही केवळ सजावटीची पानं नाहीत, तर आरोग्यासाठी वरदान आहेत. जेवणातली छोटीशी हिरवीगार सजावट आपलं आरोग्य टिकवण्याचं मोठं काम करते. म्हणूनच रोजच्या आहारात कोथिंबीर जरूर वापरा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…