आरोग्य

उष्माघात वाढतोय काळजी घ्या

आता कुठे सुरुवात झाली. उन्हाळा सुरू होऊन पण जीव नकोसा करून टाकतो त्यासाठी आता पासून हे उपाय सुरू टेवले तर उन्हाळा ची तीव्रता. कमी भासेल. शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.

उपाय

१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.

२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.

३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.

४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.

५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.

६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.

७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.

८) आवळा / कोकम / लिबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.

९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.

१०) प्रत्येक काम सावकाशच करा.

११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.

१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.

१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.

१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.

१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.

१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.

१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

6 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

6 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

6 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago