महाराष्ट्र

सातबारा उताऱ्यात झालेे 11 महत्त्वाचे बदल तुम्हाला माहीत आहे का

मुंबई: मागील 50 वर्षांत पहिल्यांदाच महसूल विभागाने मोठे बदल करून सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक आणि समजण्यास सोपे बनवले असून नवीन सुधारणा केल्यामुळे आता कोणत्याही सामान्य नागरिकाला सातबारा उतारा वाचणे सोपे जाणार आहे!

चला, या बदलांचा अधिक सविस्तर आढावा घेऊया

सातबारा उताऱ्यात पूर्वी आणि आता काय बदल झाले

गावाचा कोड क्रमांक दिसणार

आधी फक्त गावाचे नाव दिसत असे, पण आता त्यासोबत गावाचा कोड क्रमांक (LGD Code) असेल. यामुळे डिजिटल रेकॉर्ड अधिक व्यवस्थित ठेवता येतील.

जमिनीच्या प्रकाराची स्पष्टता

पूर्वी संपूर्ण क्षेत्र एकत्र नोंदवले जात असे, पण आता:

लागवडीयोग्य क्षेत्र वेगळे

पोटखराब क्षेत्र वेगळे

त्यांची एकूण बेरीज स्वतंत्रपणे दर्शवली जाईल

नवीन मापन पद्धती – संपूर्ण बदल

पूर्वी सर्वच जमिनीसाठी एकाच प्रकारचे मापन एकक वापरले जात होते, पण आता:

शेतीसाठी ➝ हेक्टर, आर, चौरस मीटर

बिनशेतीसाठी ➝ आर, चौरस मीटर

खाते क्रमांक आता सरळ दिसेल 

पूर्वी खाते क्रमांक ‘इतर हक्क’ मध्ये दिसत असे. आता तो थेट खातेदाराच्या नावासमोर दिसेल, त्यामुळे कोणत्या खातेदाराकडे किती जमीन आहे, हे लगेच समजेल.

मृत खातेदारांची माहिती स्पष्ट

पूर्वी मृत व्यक्तींच्या नोंदी कंसात दिसत होत्या. आता त्यावर आडवी रेष मारली जाईल, त्यामुळे कोण जिवंत आहे आणि कोण मृत आहे हे सहज समजेल.

प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद

पूर्वी फेरफार प्रक्रियेत असलेल्या जमिनींसाठी स्वतंत्र रकाना नव्हता, त्यामुळे नागरिकांना गोंधळ होत असे.

आता ‘प्रलंबित फेरफार’साठी स्वतंत्र रकाना असेल.

जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना

पूर्वी सर्व फेरफार क्रमांक एका ठिकाणी मिसळून लिहिले जात, पण आता जुने आणि नवीन फेरफार क्रमांक वेगळ्या रकान्यात दिसतील.

खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेषा

पूर्वी दोन वेगवेगळ्या खातेदारांची नावे एकमेकांमध्ये मिसळली जात, त्यामुळे चुकून वाचनाच्या गडबडी होऊ शकत होत्या. आता नावांमध्ये ठळक रेष असेल, त्यामुळे प्रत्येक खातेदार सहज ओळखता येईल.

गट क्रमांकासोबत शेवटचा व्यवहार दिसेल.

पूर्वी गट क्रमांक आणि शेवटच्या फेरफाराची माहिती वेगळ्या ठिकाणी शोधावी लागत असे, पण आता ती इतर हक्क रकान्यात शेवटी दिसेल.

बिनशेती जमिनींसाठी नवीन नियम

बिनशेती क्षेत्र ‘आर चौरस मीटर’मध्येच मोजले जाईल.

‘जुडी’ आणि ‘विशेष आकारणी’ हे रकाने हटवले गेले.

अकृषिक जमिनींसाठी विशेष सूचना

आता सातबारा उताऱ्याच्या शेवटी स्पष्ट सूचना असेल

सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने गाव नमुना-12 लागू नाही.

या बदलांमुळे नागरिकांना होणारे थेट फायदे

सातबारा उतारा वाचणे सोपे आणि स्पष्ट झाले.

डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाच्या कामात पारदर्शकता आणि वेग वाढला.

जमिनीशी संबंधित वाद आणि गैरसमज कमी होतील.

ऑनलाइन सातबारा उतारा काढणे आणि समजणे सोपे होणार.

बदलांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल.

ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो आणि डिजिटल सातबारा उतारा

राज्य सरकारने 3 मार्च 2020 रोजी सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली होती. यामुळे सातबारा उताऱ्याचे डिजिटायझेशन वेगाने झाले आहे आणि आता नागरिक घरबसल्या ऑनलाइन सातबारा उतारा पाहू शकतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

2 दिवस ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

3 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

3 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

3 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

4 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

4 दिवस ago