आरोग्य

टाच दुखीवर घरगुती उपाय

आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्या उद्भवतात. तर कधी खूप वेळ उभे राहील्याने, वजन अधिक असल्यास किंवा चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. मात्र हे दुखणे अतिशय असह्य होते. या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल.

बर्फाचा शेक:- टाचा दुखत असल्यास बर्फाने शेकवा. बर्फाच्या थंडाव्यामुळे पेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते. परिणाम दुखणाऱ्या टाचांपासून आराम मिळतो. त्यासाठी १५ मिनिटे बर्फाने शेकवा.

तेलाची मालिश:- टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी तेलाची मालिश हा उत्तम उपाय आहे. यामुळे दुखण्यावर लगेचच आराम मिळतो. मसाज केल्याने मसल्स रिलॉक्स होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यासाठी खोबरेल तेल, मोहरीचे तेल इत्यादीने टाचांना मसाज करा. दिवसातून ३ वेळा १०-१० मिनिटे मसाज केल्याने दुखण्यावर आराम मिळतो आणि सूजही कमी होते.

हळदीचा प्रयोग:- हळदी औषधी आणि बहुगुणी असते. हळदीतील कर्क्युमिन तत्वामुळे दुखणे, सुज यापासून आराम मिळतो. त्यासाठी एक ग्लास दूधात अर्धा चमचा हळद घालून ५ मिनिटे मंद आचेवर गरम करा. नंतर दुधात एक चमचा मध घाला आणि प्या. टाचांचेच नाही तर शरीरातील इतर भागातील दुखण्यापासून आराम देण्यासही मदत होते.

मीठ आणि पाणी:- तळवे, टाचांचे दुखणे दूर करण्यासाठी मीठाचे पाणीही उपयुक्त ठरते. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे जाडे मीठ घाला. ते नसल्यास बारीक मीठ वापरले तरी चालेल. त्यानंतर त्या पाण्यात १५-२० मिनिटे पाय बुडवून ठेवा. दुखण्यावर आराम मिळेल. त्यानंतर साध्या पाण्याने पाय धुवा

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

20 मिनिटे ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

4 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

4 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

4 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

5 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

6 तास ago