आरोग्य

दातांच दुखण दूर करणारे घरगुती उपाय

दातांचं दुखणं इतकं वेदनादायी असतं की, बोलणं, काही खाणं, काही पिणं सुद्धा जमत नाही. सोबतच झोपही लागत नाही. दात दुखण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जास्तीत जास्त लोकांना दातांना कीड लागल्यावर त्यात काही फसल्यास वेदना होतात. दातांना कीड लागल्यानं किंवा थंड-गरम काही लागल्यास असह्य वेदना होतात. पोकळ होणाऱ्या दाढींमुळेही वेदना होऊ शकतात. दातांचं दुखणं इतकं जास्त असतं की, औषधं घेऊनही आराम पडत नाही. इतकंच नाही तर दातांच्या दुखण्यामुळे चेहऱ्यावर सूज आणि डोकेदुखीची समस्याही होते. तुम्हाला जर दातांचं तुम्ही काही घरगुती उपाय करून दातांचं दुखणं दूर करू शकता. हे उपाय पूर्वी आपले आजी-आजोबा करायचे कारण त्यावेळी दातांचे इतके दवाखानेही नव्हते. या उपायांनीच त्यांना आराम मिळत होता.

दातांच दुखण दूर करणारे घरगुती उपाय

मिठाचं पाणी

दातांचं दुखणं दूर करण्यासाठी अनेक एक्सपर्ट मिठाच्या पाण्यानं गुरळा करण्याचा सल्ला देतात. कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून गुरळा करू शकता. यानं वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते, तसेच दातांमध्ये काही अडकलं असेल तर तेही निघू शकेल. मिठात नॅचरल कीडनाशक तत्व असतात, जे दातांमधील अडकलेल्या कीडेला मारतात आणि सूजही कमी करतात. दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता.

लवंग

दाताचं दुखणं दूर करण्यासाठी लवंग खूप फायदेशीर मानली जाते. दात दुखत असेल तर दाताखाली १ लवंग दाबून धरा. लवंग हलकी दाबल्यास दुखण्यापासून आराम मिळू शकतो. हवं तर तुम्ही लवंगाचं तेल रूईला लावून दातावर लावून ठेवू शकता. यानंही तुम्हाला आराम मिळू शकेल.

लसूण

दातांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लसूण वापरू शकता. लसणाची कळी चावून खाल्ल्यास दाताच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचं तत्व असतं, जे वेदना कमी करण्यास मदत करू शकत.

हळद

हळदीमध्ये नॅचरल अ‍ॅंटी-बायोटिक तत्व असतात. दातांचं दुखणं बंद करण्यासाठी हळद, मीठ आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट तयार करा. ही पेस्ट वेदना होत असलेल्या जागी काही वेळ लावून ठेवा. काही वेळात तुम्हाला वेदनेपासून आराम मिळू शकतो.

बेकिंग सोडा

वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगात येणारा बेकिंग सोडा दाताचं दुखणं दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. हा उपाय करण्यासाठी एक रूईचा बोळा पाण्यात भिजवा आणि नंतर पिळून घ्या. यावर थोडा बेकिंग सोडा लावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी लावा. यानं आराम मिळू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago