आरोग्य

कोरड्या खोकल्यावर करा असरदार घरगुती उपाय

सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकदा आपण पावसात भिजतो. पावसाळा म्हणजे दमट हवामान, सतत होणारा पाऊस आणि वातावरणात वाढलेली आर्द्रता या सगळ्यामुळे वातावरणात अनेक बदल होतात. पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या या वातावरणातील बदलांमुळे आपल्याला अनेक आजार व संसर्ग अगदी पटकन होतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः कोरडा खोकला ही एक फारच कॉमन पण त्रासदायक समस्या असते, कारण कोरडा खोकला झाल्यास घसा सतत खवखवत राहतो.

कोरडा खोकला येऊन घसा सारखा खवखवत असेल तर दिवसभर कामात लक्ष लागत नाही तसेच झोपही व्यवस्थित येत नाही. हा कोरडा खोकला एकदा झाला की जायचे नावच घेत नाही. कोरडा खोकला बराच दीर्घकाळ काळ टिकतो आणि सतत खोकून घसा दुखतो, खवखवतो व साधे बोलणेही त्रासदायक होते. काहीवेळा तर औषध घेतल्यानंतरही बरेच दिवस हा खोकला जात नाही आणि त्यामुळे थकवा व अस्वस्थ वाटते. पावसाळ्यात आपल्यापैकी बऱ्याचजणांना असा कोरडा खोकला होतो. कोरडा खोकला टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि घरच्या घरी कोणते उपाय करून आराम मिळवता येईल ते पाहूयात.

कोरड्या खोकल्यावर करा असरदार घरगुती उपाय

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला नागवेलीची ३ ते ४ पानं, आल्याचा छोटा तुकडा, १ टेबलस्पून मध, चिमूटभर काळीमिरी पूड, एक स्वच्छ सुती कापड इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.

आता नेमकं करायचं काय

सगळ्यांत आधी नागवेलीची ३ ते ४ पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. मग या पानांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता एका खलबत्त्यात नागवेलींच्या पानांचे तुकडे व आल्याचा छोटा तुकडा घेऊन हे दोन्ही पदार्थ एकत्रित कुटून बारीक करून घ्यावेत. त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडात ही खलबत्त्यातील पेस्ट घालूंन हाताने हलकेच दाबून त्याचा रस एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. त्यानंतर या रसात १ टेबलस्पून मध व चिमूटभर काळीमिरी पूड मिसळून घ्यावी. कोरड्या खोकल्यासाठी आपले घरगुती सिरप पिण्यासाठी तयार आहे. रोज सकाळी उपाशीपोटी १ टेबलस्पून हे नागवेलींच्या पानांचे सिरप प्यायल्यास कोरड्या खोकल्याची समस्या कमी होण्यास मदत होते. याचबरोबर, सतत खोकून घसा दुखत असेल तर, या उपायाने घशाला आराम मिळतो.

नागवेलीच्या पानांचे घरगुती सिरप पिण्याचे फायदे

१) नागवेलीची पान: श्वसनमार्ग मोकळा करुन कोरड्या खोकल्याचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.

२) आल: आल्याचा तुकडा घशाची खवखव आणि जळजळ कमी करतो.

३) मध: मध वारंवार खोकून थकलेल्या घशाला आराम देतो आणि खोकल्याची तीव्रता कमी करतो.

4) काळीमिरी पूड: काळीमिरी पूड जंतुसंसर्ग कमी करून प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

3 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

11 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

21 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

21 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

21 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

21 तास ago