आरोग्य

कँल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद ,अस्थी ,मज्जा व शुक्र हे सात धातू असतात. हे शरीराचे धारण करतात म्हणून यांना धातू असे म्हणतात. या सात धातू पैकी अस्थिधातूमुळे आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो.या अस्थिधातूमध्ये कॅल्शियम हा महत्त्वाचा घटक असतो .कॅल्शियम मुळे शरीरातील जैविक घटकांचे संतुलन कायम राहते .आपल्या आहारातून मिळणाऱ्या कॅल्शियम मुळे रक्तामधील कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहते .कॅल्शियम मुळे पेशीचे आरोग्य उत्तम राहते .स्नायूंच्या बदलामुळे शरीरातील हाडांच्या संरचनेमध्ये बदल होत असल्याने कॅल्शियमची गरज जास्त प्रमाणात असते .शरीरातील मणके, अस्थी यामध्ये शक्ती टिकून राहण्यासाठी तसेच स्नायू व हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत देखील कॅल्शियमचे महत्त्व खूपच असते .कॅल्शियम हा दात व अस्थि यामधील मूलभूत घटक असल्याने शरीरातील पेशींच्या कार्यांबरोबर पेशींचे विभाजन, रक्तसंचलन ,हाडाचे आकुंचन व प्रसारण यासाठी कॅल्शियमची गरज असते.

शरीरातील कॅल्शियम हे विटामिन डी. थायराइड ,हार्मोन्स आणि कॅल्सीटोनील याद्वारे नियंत्रित केले जाते. त्यामुळे शरीरातील व रक्ताची कॅल्शियमचे प्रमाण नेहमी योग्य राहते विटामिन डी आतड्यातील व किडनीतील कॅल्शियम रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी मदत करते. आपल्या शरीराला विटामिन डी ही कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळत असते .विटामिन डी च्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. याशिवाय आहारातून कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन न करणे, पचनशक्ती मंदावणे यामुळे आहारातील कॅल्शियमची शोषण कमी होते तसेच स्त्रियांना मासिक पाळीत अतिरिक्त स्त्राव होणे, स्त्रियांची मासिक पाळी येणे बंद झाल्यानंतर हार्मोनचे संतुलन बिघडणे व ऊन आणि शारीरिक श्रमांचा अभाव, गोड पदार्थांची अति सेवन करणे ,नवजात बालकांना मातेचे दूध न मिळणे यामुळे देखील कॅल्शियमची कमतरता निर्माण होते .प्रत्येक स्त्रीमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरातील हार्मोन्सची संतुलन बिघडल्याने संपूर्ण शरीरातील हाडे ठिसूळ लागतात. या दिवसांमध्ये फक्त आहारातून कॅल्शियम घेऊन पूर्तता शकत नाही त्यासाठी आयुर्वेदिक कॅल्शियमची औषधे घेणे गरजेचे असते अन्यथा स्त्रियांच्या शरीरातील हाडे ठिसूळ होऊन थोडाश्या आघाताने देखील भग्न होऊ शकतात.

अनेक स्त्रियांना हाता पायांना मुंग्या येणे, मणक्याचे विकार उद्भवणे,मान व कंबर दुखणे, सकाळी उठताना त्रास होणे, चालताना त्रास होणे ,मांडी घालून जास्त वेळ बसू न शकणे. शौचाला बसता न येणे ,चक्कर येणे, गुडघेदुखी ,लवकर थकवा येणे ,दात दुखणे, नखे ठिसूळ झाल्याने तुटणे, केस गळणे, सतत भीती वाटणे, ताण तणाव जाणवणे ,स्मरणशक्ती कमी होणे व झोप न लागणे अशा अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागते तथापि बहुतांश स्त्रियां त्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

स्त्रियांनी वयाच्या पन्नाशीनंतर आहारात कॅल्शियम पदार्थांचे प्रमाण वाढवावे.त्यासाठी कँल्शियम युक्त आहाराचे सेवन करावे.पुढील पदार्थ हे कँल्शियमयुक्त असतात. त्यांचा आहारात समावेश करावा.

गहू, बाजरी ,नाचणी, दूध व दुधाचे सर्व पदार्थ, मुगडाळ ,सोयाबीन, वाटाणे, मटकी, राजमा, कढीपत्ता, कोबी, मेथी, मुळ्याची पाने, पुदिना, कोथिंबीर ,काकडी, गवार ,टोमॅटो,

मनुका, बदाम, पिस्ते, अक्रोड, खरबुजाच्या बिया, नारळ, आंबा, सिताफळ, संत्रा ,अननस ,ओवा ,जिरे, हिंग, लवंग, व काळे मिरे या पदार्थांचा आहारात समावेश असावा.

कँल्शियम वाढण्यासाठी घरगुती उपाय

सकाळी एक ग्लास ताज्या ऊसाच्या रसामध्ये एक गुंज चुना टाकून प्यावा.

जेवणानंतर नागवेलीचे ( खायचे )पान व चुना खावा.

रात्री झोपण्यापूर्वी ऊक ग्लास दूधात गूळ टाकून प्यावा.

सुरमई माशाचे सेवन करावे.

बदाम ,सुके अंजीराचे सेवन करावे.

आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन जास्त करावे.

स्वयंपाकात तीळ तेलाचा वापर करावा.

रोज आवळ्याचे सेवन करावे

एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकून उकळून घ्यावे व थंड झाल्यावर सकाळी व सायंकाळी प्यावे.

बाभळीच्या बियांचे सूक्ष्म चूर्ण तूप व मधासोबत घ्यावे.

बाभळीच्या डिंकाचे चूर्ण तूप साखरेसोबत घ्यावे.

एक कप दूधात एक चमचा बडिसोप टाकून दूध उकळुन घेऊन त्यामध्ये एक चमचा बाभळीच्या डिंकाचे चूर्ण टाकून ढवळून थंड झाल्यावर घ्यावे.

वयाच्या पन्नाशी नंतर स्त्रियांना तसेच पुरुषांना देखील कँल्शियम ची कमतरता असतेच. तथापि त्याकडे दुर्लक्ष करणे खूपच नुकसान दायक ठरू शकते. तेव्हा पन्नाशी नंतर प्रत्येक व्यक्ती ने त्यासाठी आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतल्यास व्रुध्दत्व सुखकर होते हे नक्कीच.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

6 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago