आरोग्य

आहार आणि आपले आरोग्य

असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल. आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला, तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार.

आयुर्वेदातील आहाराचे नियम पुढीलप्रमाणे आहेत

१) आपल्या पोटाचे चार भाग करावेत. त्यातील दोन भाग हे घन आहारासाठी ठेवावेत, एक भाग हा जलासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा, जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो, आहार हा योग्य रीतीने पचला, तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते.

2) सकाळी उठल्या बरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे. लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त, तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो.

3) जेवणाआधी अर्धा तास एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये मध्ये एखादा घोट पाण्याचा प्यावा. त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.

4) कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये. असं वारंवार केल्यास मळमळणे, वा छातीत जळजळणे सुरू होते, तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही. कारण दोन्हींच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.

5) अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये, पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो.

6) दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये, असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते.

7) दुपारचे जेवण हे सकाळच्या जेवणापेक्षा थोडे कमी असावे, मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसून येतात.

8) आहार हा ताजा बनवलेला, फ्रिज मधील थंड नसावा. तसेच फ्रिज मधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.

9) पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही, म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये. असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांना देखील कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये चार तासांचे अंतर असावे.

10) प्रत्येक जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे, त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते.

11) रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे (केवळ फोडणीपुरते नाही) तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते, प्रतिकार शक्ती कायम ठेवते, तसेच ते एक उत्तम रसायन देखील आहे. शक्यतो गाईचे तूप हे उत्तम, मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूप देखील उत्तम असते.

12) दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये. जसे फ्रुट कस्टर्ड, शिकरण. असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोग निर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते.

13) अतिकोरडे, अतितेलकट, अतिगरम, अतिशीत, अतिस्निग्ध असा आहार नसावा. सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

8 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago