आरोग्य

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल लहान वयातच केस पांढरे होणे ही साधारण समस्या बनली आहे. या समस्येचे मुख्य कारण व्यस्त जीवनामध्ये केसांची नीट देखभाल न होणे. प्रदूषण हे आहे. यामध्ये लहान वयाचतच झालेले पांढरे केस लपविण्याकरिता हेअर डाय किंवा हेअर कलर हा एक मात्र उपाय नाही. काही घरगुती उपाय केले पांढ-या केसांना काळे नैसर्गिकरित्या काळे करू शकता. या साध्या सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही लहान वयात झालेल्या पांढ-या केसांना काळे करू शकता.
दोडक्याचे काप खोबरेल तेलात काळे होईपर्यंत उकळा. यांनतर हे तेल गाळून एका बाटलीमध्ये भरून ठेवा. रोज हे तेल केसांना लावल्यास हळूहळू तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतील.
तीळाचे तेल ही गुणकारी असते. बरोबरच याच्या सेवनाने बरेचसे फायदे होतात. जर आपण जेवणात तीळाचा समावेश केला तर दीर्घकाळापर्यंत केस काळे व घनदाट होतील.
केस धुताना शिकेकाई पावडर किंवा माईल्ड शॅम्पू वापरावा.
एक कप पाण्यात चहापत्ती उकळून यामध्ये एक चमचे मीठ टाकावे. हे मिश्रण केस धुण्यापूर्वी एक तास आधी लावून ठेवल्याने केस काळे होतात.
खोबरले तेलात ताज्या आवळ्यांना काळे होईपर्यंत उकळा. या मिश्रणाला थंड करून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. आणि सकाळी केस धुवा.
आले वाटून त्यामध्ये थोडासा मध घालून पेस्ट तयार करावी आणि ती केसांना लावावी. हा उपाय दररोज केल्याने पांढरे केस काळे व्हायला लागतात.
केसांना दररोज मोहरीचे तेल लावल्याने केस नेहमी काळे राहतात.
खोबरेल तेलात कडिपत्त्याची पाने काळी होईपर्यंत उकळा. या तेलाला केसांच्या मुळाशी लावल्याने केस काळे व घनदाट होतात.
रोज उपाशी पोटी आवळ्याचा रस पिल्याने केस दीर्घकाळापर्यंत काळे राहतात.
सुक्या आवळ्यांना पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये निलगीरीचे तेल मिसळा. या तेलाला एक रात्र लोखंडी भांड्यात ठेवा. सकाळी यामध्ये दही, लिंबूचा रस व अंडे घालून केसावर लावा. पंधरा दिवस हा उपाय केल्यावर केंसामध्ये एक चमक येऊन पांढरे केस काळे होऊ लागतात.
आवळ्याचा रस, बादाम तेल व लिंबाचा रस एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी लावल्याने केस पांढरे होणार नाहीत.
कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस गळायचे थांबतात व पांढरे होत नाहीत.
लहानपणीच केस पांढरे झाल्यास एक ग्रॅम मिरी पावडर दह्यात मिसळून लावल्याने केस काळे होतात.
1 चमचा मेहंदी पावडर, 1 चमचा मेथी, 3 चमचे कॉफी, 2 चमचे तुळशीची पावडर, 3 चमचे पुदीना पेस्ट एकत्र मिसळून केसांना लावा. 3 तासानंतर केस धुवा. पांढरे केस काळे होऊ लागतील.
मेहंदीला खोबरेल तेलात मिसळून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टला केसांना लावल्यानंतर केसांचा रंग डार्क ब्राऊन होऊ लागतो.
केस धुण्यासाठी लिंबू रस मिसळलेल्या पाण्याचा उपयोग करावा. केस नैसर्गिकरित्या ब्राऊन होतात.
लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून नियमितपणे लावल्यास केस काळे होऊ लागतात.
आवळा व आंब्याची कोय ही एकत्र वाटून केसांना लावल्यास केस काळे होतात.
केसांना रोज मेरी तेल लावल्यास केस काळे होतात.
कांद्याचा रस काढून केसांच्या मुळाशी हलक्या हाताने लावल्यास केस काळे व घनदाट होऊ लागतील.
आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने किंवा ताज्या आवळ्यांना वाटून त्याची पेस्ट केसांना लावल्यास केस काळे व घनदाट होतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

2 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago