आरोग्य

पित्त होण्याची कारणे कोणती

चुकीचा आहार: तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते.

अपेय पान: आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते.

ऊन सहन न होणे: जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला ऊन सहन झाले नाही तर शरीरातील पित्त वाढू लागते.

भावनिक ताण: कोणत्याही गोष्टीचा अति विचार करून भावनिक ताण तणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो.

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

अमृत फळ आवळा: चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे. त्यामधील व्हिटॅमिन सी अन्ननलिका, पोट स्वच्छ ठेवते. पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता. आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता. हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्त विकार कमी होतो.

मूग आणि तांदूळ: जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा. मूग पित्तशामक आहे. तसेच साधा मूग आणि तांदळाचा नीर डोसा देखील खाऊ शकता. तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

उष्ण आलं आणि रसदार लिंबू: आपल्या मनात येईल आलं उष्ण तिखट आहे पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर होतो. आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त कमी होते. लिंबाचा रस त्यातील व्हिटॅमिन सी मुळे पित्तशय स्वस्थ होते. जेवणात आलं घ्यावं. तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ, लिंबाचा रस, किंचित साखर घालून हे सरबत चमचाने थोडथोड पित राहावं.

कोकम: आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते. त्यामधे देखील प्रचुर व्हिटॅमिन सी असते. कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शमंत होते.

थंड दूध: थंड दुध वाढलेली जळजळ कमी करते. थोडेसे थंड दूध किंचित साखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते.

पिकलेले केळे: केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं. त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच शरीराल फायबर मिळते जे पचन क्रिया वेगवान करते. जर आपल्याला कोणता आजार असेल व आपल्याला त्यापासून लवकरात लवकर सुटका हवी असेल त्यासाठी आमच्याकडे प्रत्येक आजारावर विशिष्ट व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत त्यासाठी तुम्ही आमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago