आरोग्य

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं कितपत योग्य? तुम्हीही या दिवसांत डोक्याला मालिश करत असाल तर…

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पंखा, कुलर असूनही अंगातून, डोक्यातून घामाच्या धारा येत असतात. एसीच्या गारेगार हवेत तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण आपण काही २४ तास एसीमध्ये बसू शकत नाही. त्यामुळे खूप घाम येऊन या दिवसांत आपलं डोकं बऱ्याचदा ओलंच राहतं. अशा ओलसर, घामट झालेल्या केसांना तेल लावणं कितपत योग्य आहे, त्याचा खरंच या दिवसांत केसांना फायदा होऊ शकतो का या दिवसांत डोक्याला तेल लावायचंच असेल तर ते कोणतं आणि कशा पद्धतीने लावाव.

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं योग्य आहे का

या उन्हाळ्याच्या घामट दिवसांमध्ये डोक्याला तेल लावायचं असेल तर बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल, कॅस्टर ऑईल असं कोणतंही घट्ट तेल वापरू नका. या दिवसांत अतिशय हलक्या आणि केसांना खूप चिकटून न राहणाऱ्या तेलाचा वापर करावा.

कारण चिकट तेलामुळे आधीच घामट झालेले केस आणि डोक्याची त्वचा आणखीनच खराब होते. त्यामध्ये धूळ, घाण चिटकून बसते. यामुळे मग डोक्याच्या त्वचेचे ओपन पोअर्स बंद होऊन कोंड्याचे प्रमाण वाढणे, डोक्यात फोड येणे, खाज येणे असे त्रास सुरू होतात. त्यामुळे या दिवसांत केसांना आर्गन ऑईल, खोबरेल तेल लावून मालिश करणं अधिक योग्य. तसेच तेल नेहमीपेक्षा थोडे कमी प्रमाणात घेतले तरी चालेल. डोक्यातल्या ओलसरपणामुळे आणि सततच्या घामामुळे केसांची मुळं आधीच नाजुक झालेली असतात. त्यामुळे तेल लावताना खूप जोरात चोळू नका. बोटाच्या टोकांनी हळूवारपणे गोलाकार फिरवत डोक्याला मसाज करा. तसेच केस धुण्याच्या एक ते दोन तास आधीच केसांना तेल लावून ठेवा. तेल लावल्यानंतर कडक उन्हामध्ये बाहेर जाणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago