आरोग्य

वात – पित्त – कफ या प्रकृतीनुसार कुणाला किती तास झोप आवश्यक

आपल्या डेली रुटीनमध्ये ‘झोप’ ही देखील तितकीच महत्वाची असते. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो. जर आपल्या झोपेची पद्धत किंवा वेळ चुकीची असेल तर त्याचा हळुहळु आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो.

झोप नीट झाली नाही तर आपल्याला अपचन, गॅस, अ‍ॅसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात इतकेच नव्हे तर हार्मोनल इम्बॅलेन्सदेखील होऊ शकतो. सध्याच्या काळात झोप न येणं ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडते आणि काहीवेळा त्यामुळे चिंता वाढते. कमी झोपेमुळे डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, तणाव, चिंता, एकाग्रतेचा अभाव ते रक्तदाबाच्या समस्यांपर्यंतच्या अनेक समस्या वाढतात. अशा परिस्थिती आयुर्वेदानुसार, वात – पित्त – कफ अशा तीन प्रवृत्ती असतात.

शरीराच्या प्रकृतीनुसार कोणी किती तास झोपावे ते पाहा…  

वात प्रकृती: वात प्रकृतीच्या व्यक्तींचा बारीक बांधा असतो, तसेच या व्यक्ती अधिक जास्त विचार करतात. वात प्रकृतीच्या व्यक्तींना खरतर अंथरुणात पडल्या – पडल्या झोप येते. परंतु जर एकदा का त्यांची झोपमोड झाली की त्यांना बराचवेळ झोप लागत नाही. वात प्रकृतीच्या व्यक्तींची झोपमोड झाल्यावर त्यांना पुन्हा झोप येणे खूपच अवघड असते. यासाठीच, वात प्रकृती असणाऱ्यांना शांत झोपेची सर्वात जास्त गरज असते त्यामुळे त्यांनी किमान ८ तासांची सलग झोप घेणे गरजेचे असते.

पित्त प्रकृती: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा शारीरिक बांधा हा मध्यम असतो, तसेच त्यांना भूक देखील जास्त लागते. तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना गरजेपुरता बऱ्यापैकी झोप लागते. त्यामुळे त्यांना खूप जास्त झोपेची गरज नसते शरीराला आवश्यक असणारी झोप त्यांना मिळत असते. त्यामुळे त्यांना किमान ७ ते ८ तासांची झोप पुरेशी असते.

कफ प्रकृती: कफ प्रकृतीच्या व्यक्ती या शरीराने स्थूल असतात. त्याच्या शरीरात एक प्रकारचा आळस असतो. या व्यक्ती फारशा अ‍ॅक्टिव्ह नसतात. यासाठी या व्यक्तींनी चांगल्या आरोग्यासाठी सतत अ‍ॅक्टिव्ह असणे गरजेचे असते. त्यामुळे या कफ प्रकृतीच्या व्यक्तींना ५ ते ६ तासांची झोप पुरेशी असते. कमी झोप घेऊन त्यांनी जास्त अ‍ॅक्टिव्ह असणे गरजेचे असते. यामुळे त्यांचे वजन कमी होण्यास देखील अधिक मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

7 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

7 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

7 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

7 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

8 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

8 तास ago