आरोग्य

लिव्हर डिटॉक्स कसं कराल

लठ्ठपणा वाढणं ही एक वेगानं वाढणारी समस्या बनत आहे. एकदा का लठ्ठपणा वाढला तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या शरीरात घर करततात. इतकंच नाही तर एकदा वाढलेली चरबी कमी करणंही खूप अवघड ठरतं. त्यामुळे शरीरात वाढत असलेली चरबी कंट्रोल करणं खूप महत्वाचं ठरतं. पण अनेकदा प्रयत्न करूनही वजन काही कमी व्हायचं नाव घेत नाही. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर याला कारणीभूत लिव्हर हा अवयव असू शकतो. न्यूट्रिशनिस्टनुसार, लिव्हर वजन कमी करण्यात अडथळा निर्माण करतं. त्यामुळे तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर त्याआधी लिव्हर डिटॉक्स करणं गरजेचं ठरतं.

लिव्हर डिटॉक्स कसं कराल

लिंबू पाणी

लिव्हरसाठी लिंबू खूप फायदेशीर ठरतं. रोज सकाळी १ ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास लिव्हरमध्ये जमा विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. लिंबू पाण्यानं लिव्हर डिटॉक्स होतं आणि पित्ताचा प्रवाह सुद्धा वाढतो.

मेथीचं पाणी

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी मेथीचे दाणे खूप प्रभावी ठरतात. याचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी हलकं कोमट करून प्यावं. यानं लिव्हर मजबूत होईल आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होईल. तसेच लिव्हरवरील सूजही कमी होईल.

बिटाचा ज्यूस 

लिव्हर साफ करण्यासाठी बीट खूप फायदेशीर मानलं जातं. रोज बिटाचा ज्यूस प्यायल्यास लिव्हर डिटॉक्स होतं. यात बीटाइन तत्व भरपूर असतं, जे वजन कमी करण्यासही मदत करतं.

हळदीचं दूध

हळदीच्या दुधाचे अनेक फायदे सांगितले आहेत. लिव्हरसाठी हळद खूप फायदेशीर असतं. लिव्हर डिटॉक्ससाठी दुधात चिमुटभर हळद आणि काळी मिरी पूड टाकून प्याल तर फायदा मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

7 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

10 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

10 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

10 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

10 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

10 तास ago