तापमान वाढलं की, शरीरात पाणी कमी होत असल्यानं पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होणं कॉमन आहे. खासकरून जुलाब आणि अपचनासारख्या समस्या अधिक होतात. तुम्हाला सुद्धा या समस्या नेहमीच होत असतील तर यावर एक आयुर्वेदिक उपाय आहे.
काय आहे घरगुती उपाय
एक चमचा दह्यात ४ ते ५ कढीपत्ते आणि चिमुटभर हळद टाका. तुम्हाला हे मिश्रण फोडणी न देता असंच खायचं आहे. दिवसातून एकदा दुपारी हा उपाय करावा. यानं तुम्हाला लगेच आराम मिळेल. ४ ते ५ दिवस हा उपाय करा. पोटात गडबड होण्याची समस्या लगेच दूर होईल.
कसा मिळतो फायदा
दही, हळद आणि कढीपत्ते पोटासाठी खूप फायदेशीर असतात. दह्यात लॅक्टोबॅसिलस आणि बिफीडो बॅक्टेरिया सारखे प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढतात.
कढीपत्त्यांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि पचन सुधारणारे गुण असतात. यानं आतड्या साफ होतात आणि त्यामुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते. तसेच हळदीमध्ये नॅचरल अॅंटी-सेप्टिक गुण असतात, जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. अशात तिन्ही गोष्टींचं मिश्रण पोटातील उष्णता, जळजळ कमी करण्यास मदत करतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…