आरोग्य

पावसाळ्यात साथीच्या रोगांपासून मुलांना दूर कसे ठेवाल

पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच तो साथरोगांचा हंगामही असतो. मात्र पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवेतील जतूंच्या वाढीसाठी पावसाळा पोषक ठरतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, व्हायरल ताप, सर्दी-खोकला, अन्न-विषबाधा यांसारखे अनेक संसर्गजन्य रोग वाढतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा कमी असते, त्यामुळे त्यांना या रोगांचा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

या साथींच्या रोगांचा धोका: हिवताप, डेंग्यू, झिका, इन्फ्लुएंझा, इन्फ्लुएंझा ए, कावीळ, कॉलरा, टायफॉइड, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, लेप्टोस्पयरोसिस, फंगल इन्फेक्शन यासारखे आजार होऊ शकतात.

पाणी उकळून प्या: पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे घरी येणारे पाणी उकळून प्यावे. उघड्यावरचे

अन्नपदार्थ ३ खाऊ नका: शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. कारण याकाळात त्या 3 पदार्थामधून जंतुसंसर्गाची लागण होऊ शकते.

साचलेल्या पाण्यातून जाऊ नका: साचलेल्या पाण्यातून चालण्यास मुलांना मज्जाव करा. कारण त्याद्वारे लेप्टोस्पयरोसिस होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांमुळे ताप येतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरच्या घरी उपचार न करता डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या, त्यांनी सांगितलेल्या चाचण्या करून आजाराची निदान निश्चित करून घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. या काळात ताप आल्यास स्वतःच घरच्या घरी उपचार करू नये. डॉक्टरांकडून आजाराचे निदान करून त्यावर वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

23 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago