झोपण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे रात्री. दिवसभरात शरीर थकते, आणि हा थकवा दूर करण्यासाठी आपण रात्री झोपतो. शरीराला ८ तासांची झोप हवीच. ८ तास शरीराला विश्रांती मिळाल्याने दिवसभराचा थकवा तर दूर होतोच. शिवाय सकाळी ताजेतवाने वाटते. पण बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर अंग दुखते. किंवा रात्री खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. अपचनामुळे रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. असे का होते? याचा आपण कधी विचार केला आहे का.
झोपताना आपण कोणत्या पद्धतीने झोपत आहोत, पोझिशन देखील महत्वाची ठरते. कारण बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने झोपतात. ज्यामुळे चांगली झोप लागत नाही आणि शरीर तणावाखाली राहते. आरोग्य तज्ज्ञ आणि लेखक प्रशांत देसाई यांनी उत्तम झोपेसाठी बेस्ट पोझिशन याची माहिती दिली आहे. शिवाय झोपताना कोणत्या चुका टाळायला हव्या.
पाठीवर झोपणे चूक
झोपेच्या समस्येवर त्रस्त लोकांवर संशोधन केले असता, झोपेच्या चुकीच्या स्थितीमुळे झोपमोड आणि अंगदुखीचे कारण बनते. जे लोक पाठीवर झोपतात, त्यांना गाढ झोप येत नाही.ज्यामुळे मध्यरात्री अचानक जाग येते आणि झोपमोड होते.
मोठ्याने घोरणे
जे लोक पाठीवर झोपतात, त्यांच्या जबडा आणि घशाच्या स्नायूंवर दबाव येतो. श्वासोच्छवासाच्या नलिकेत अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे लोक तोंडाद्वारे श्वास घेतात आणि घोरतात. शिवाय स्लीप एपनियाचाही त्रास होतो.
उशी घेऊन झोपणे
या समस्येवर उत्तम उपाय म्हणजे उशी घेऊन झोपणे. उशीमुळे मानेला आणि शरीराला आधार मिळतो. शिवाय श्वासोच्छ्वासाची नळी उघडी राहते. ज्यामुळे झोप चांगली लागते.
साईड पोझिशन बेस्ट
साईड पोझिशनमध्ये झोपल्याने श्वासोच्छवासाच्या नलिकेत अडथळे येत नाही. ज्यामुळे घोरत नाही. त्यामुळे झोपताना नेहमी साईड पोझिशनमध्ये झोपावे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…