आरोग्य

साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल वेळीच व्हा सावध, किडनी होऊ शकते फेल

लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोगांचा धोका वाढतो. साखरेमध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात आणि पोषण कमी. अशात बरेच लोक साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्यात काही चुकीचं देखील नाही. बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर करतात. पण तुमची एक चूक तुमच्या किडनी खराब करू शकते.

साखरेऐवजी गूळ खाणं चांगलंच आहे. पण आजकाल गुळात नुकसानकारक केमिकल्सचा वापर केला जात आहे. अशात भेसळयुक्त गूळ किडनीसाठी कसा धोकादायक आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सोबतच गुळाची शुद्धता कशी ओळखावी.

वॉशिंग सोडा घातक

वॉशिंग सोड्याचा वापर सफाई आणि इंडस्ट्रिअल यूससाठी केला जातो. यात भरपूर प्रमाणात सोडिअम कार्बोनेट असतं. हे खाल्ल्यास शरीराचं नुकसान होतं. तोंड, घशा आणि पोटात जळजळ होऊ शकते. तसेच यानं उलटी आणि डायरियाही होऊ शकतो. टिश्यू जळूही शकतात आणि आतड्यांमध्ये अल्सरही होऊ शकतो.

सोनेरी रंगही घातक

हा रंग खाण्याच्या पदार्थांमध्ये टाकण्यावर बंदी आहे. पण बरेच लोक कायदा तोडून हा रंग मिठाई, हळद आणि डाळींमध्ये मिक्स करतात. या रंगामुळेही मळमळ, उलटी, पोटदुखी आणि डायरिया यांसारख्या समस्या होऊ शकतात.

किडनी-लिव्हरचं नुकसान

वॉशिंग सोड्यातील केमिकलमुळे लिव्हर आणि किडनीचं मोठं नुकसान होऊ शकतं. हे अवयव फेलही होऊ शकतात. मेटानिल येलो रंग ओटोटॉक्सिसिटी, हेपाटोटॉक्सिसिटी आणि आतड्यांना डॅमेज करतो. यामुळे किडनी, लिव्हर डॅमेज होऊ शकतात.

कशी चेक कराल शुद्धता?

एका पारदर्शी ग्लासमध्ये पाणी टाका. आता यात १० ग्रॅम गुळाचं पावडर टाका. जर गुळामध्ये चॉक पावडर मिक्स केलं असेल तर पाण्यात खाली येऊ बसेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

16 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

16 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

16 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

16 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

16 तास ago