आरोग्य

थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली असेल तर या २ गोष्टी करा

आपल्यापैकी बऱ्याचजणांना थायरॉईडचा त्रास सतावतो. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे काम न केल्यास शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्याचे परिणाम वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे, त्वचेचा कोरडेपणा, चिडचिड यांसारख्या स्वरूपात दिसून येतात. थायरॉईड ही महिलांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली समस्या असल्याचे दिसते. हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे थायरॉईड होतो. वेळीच थायरॉईड झाल्याचे लक्षात न आल्यास ही समस्या वाढते आणि आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. थायरॉईडची समस्या ही किरकोळ न समजता वेळीच त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

थायरॉईडची समस्या असेल आणि याकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही तर, गळ्याला सूज येणे, गळ्यात वेदना होणे अशा इतरही समस्या सतावतात. थायरॉईडमुळे गळ्याला आलेली सूज आणि वेदना नकोशा वाटतात, यासाठीच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांनी थायरॉईडच्या समस्येवर घरगुती उपाय म्हणून खास २ गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे थायरॉईडच्या समस्येपासून आपल्याला घरगुती उपायांमुळे लगेच आराम मिळू शकतो.

थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी खास उपाय…

एका भांड्यात १०० मि. ली पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून धणे, प्रत्येकी ४ ते ५ तुळशीची पाने आणि पुदिन्याची पाने घालावीत. आता गॅसच्या मंद आचेवर हे भांड ठेवून पाणी थोडे आटवून घ्यावे, पाण्याला हलकी उकळी येऊ द्यावी. त्यानंतर हे पाणी आटवून जवळपास अर्धे झाल्यावर गाळणीने पाणी गाळून घ्यावे. हे पाणी थोडे कोमट गरम असतानाच प्यावे.

धणे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. तुळस नैसर्गिकपणे हॉर्मोनल संतुलन ठेवण्यास मदत करते , शरीरातील सूज कमी करते व थायरॉईडची समस्या हळुहळु कमी होण्यास मदत होते. पुदिना मेटाबॉलिजम सुधारतो आणि थकवा दूर करतो जो हायपोथायरॉईडमध्ये सामान्यतः जाणवतो.

हा थायरॉईड स्पेशल चहा नियमितपणे सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास थायरॉईडचे कार्य सुधारण्यास मदत होते आणि इम्युनिटीही वाढते. थायरॉईडचे इतर लक्षणे जसे वजन वाढणे, थकवा, केसगळती यांसारख्या समस्यांवरही चांगला परिणाम दिसून येतो.

दुसऱ्या उपायांमध्ये, न्यूट्रिशनिस्ट यांनी थायरॉडमुळे आलेली गळ्याची सूज कमी करण्यासाठी एक खास घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी सर्वातआधी एका स्वच्छ सुती कापडावर हलके गरम करुन घेतलेले एरंडेल तेल ओतावे. आता हा कपडा आल्या गळ्याभोवती गोलाकार पद्धतीने हलकेच बांधून ठेवून द्यावा. किंवा ज्या भागात जास्त सूज आलेली असेल त्या भागात आपण हे तेल लावलेले कापड ठेवू शकता.

हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करु शकतो. गळ्यावर १५ ते २० मिनिटे अशा प्रकारे एरंडेल तेल लावलेले कापड ठेवल्यास, गळ्यावरील सूज कमी करण्यात मदत होते आणि थायरॉईडच्या कार्यास नैसर्गिकरित्या आधार मिळतो. यामुळे आराम मिळतो आणि थायरॉईड फंक्शन हळूवारपणे सुधारते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

10 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

10 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

15 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

15 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

15 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

15 तास ago