आरोग्य

फक्त चालून शुगर कमी होते का, डायबिटिस असेल तर नक्की कधी आणि किती चालाव

जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण सगळ्यात जास्त आहेत. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहारात बदल करण्यासोबतच वॉक करूनही तुम्ही शुगर नियंत्रित ठेवू शकता.

पायी चालून शुगर कमी होते

डायबिटीसच्या रूग्णांनी अॅक्टिव राहणं फार गरजेचं असतं. शुगर असेल तर अॅक्विट राहून तुम्ही शुगर कंट्रोल करू शकता. सुस्त जीवनशैली डायबिटीसचा धोका अधिक वाढवते. मुळात डायबिटीसचे रूग्ण जेवढं जास्त चालतील तेवढी त्यांची शुगर लेव्हल कमी होते.

पायी चालण्याचा कसा पडतो प्रभाव

वेगानं चालल्यास पॅनक्रियाजचे सेल्स वेगानं कमी होण्यास मदत मिळते. या पद्धतीनं शुगर मेटाबॉलिज्म बूस्ट करते आणि अन्नातून शुगर लवकर पचवून रक्तात याचं प्रमाण वाढण्यापासून रोखता येते. पायी चालल्यानं नेहमीच तुमची शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

डायबिटीसमध्ये किती पायी चालाव

अमेरिकन डायबिटीस असोसिएशननुसार, रोज किमान १० हजार पावलं किंवा कमीत कमी ३० मिनिटं पायी चालायला हवं. यानं तुमची शुगर लेव्हल कंट्रोल होते. जर तुम्हाला एकदम ३० मिनिटं चालणं अवघड जात असेल तर सकाळी, दुपारी आणि सायंकाळी चालण्याचा वेळ विभागून घ्या. तसेच डाएटमध्येही बदल करा. कार्ब्स पचवण्यासाठी जास्त चालण्याची गरज असते. पायी चालताना स्पीड एकसारखा असणं फार गरजेचं असतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago